शेतीशिवार टीम, 27 जून 2022 : नमस्कार, शेतकरी मित्रांनो आपण शेतीशिवारच्या माध्यमातून वेळोवेळी शेत जमिनीचे कायदे, शेती विषयक योजना, बाजारभाव, किंवा इतर काही महत्त्वपूर्ण घडामोडी याच्याबद्दल माहिती घेण्याचा करत आहोत. परंतु आज आपण 100 रुपयांमध्ये जमिनीचे वाटणी पत्र होतं का ? त्या वाटणीपत्राला काही आधार आहे का ? याबद्दलचे शासन निर्णय काय आहे ? पात्रता ? अटी ? PDF फॉर्म, मार्गदर्शक सूचना, याबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही ही सर्व माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा… 

तुम्हाला तर माहीतच आहे की, येत्या काही दिवसांत पाडव्याचा मुहूर्त साधून कुटुंबांमध्ये बऱ्याच ठिकाणी वाटणीपत्र करण्यासाठी लगबग सुरू असते आणि म्हणून या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येकालाच पडलेला प्रश्न की, शेतजमिनीची नेमकी वाटणी कशी करायची ? बऱ्याच शेतकऱ्यांना वाचनामध्ये असं आलं आहे की, 100 रुपयांमध्ये जमिनीची वाटणी पत्र कशा प्रकारे केलं जातं ?

एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर शेत जमिनीची वाटणी लाभार्थ्याला एखाद्या शेतकऱ्याला नवीन हक्क नसतो, तर ते फक्त त्याच्या वडिलोपार्जित जमिनीमधून केलेली विभागणी असते, म्हणजे एखाद्या वडलोपार्जित जमिनीमधून जे काही सह-हिस्सेदार असतील जे काही वारस असतील या वारसाला केलेली विभागणी म्हणजे वाटणीपत्र असतं.यामध्ये नवीन मालकी निर्माण होत नाही…

तर मित्रांनो, शेत जमिनीच्या वाटणीपत्रमध्ये एकूण तीन प्रकारानुसार वाटणी केली जाते…

1) महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप …

2) दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप.

3) दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप.

या तीन प्रकारामधून आपण….

महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप बद्दल जाणून घेणार आहोत. या माध्यमातूनच तुमची 100 रुपयांत जमीन नावावर होणार आहे.

हे वाटप महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप तहसिलदारांसमोरच तहसीलदारांच्या संमतीवरच केलं जातं. यासाठी तुम्हाला सर्व सहहिस्सेदारांची संमती घ्यावी लागेल. अन यामध्ये जबाब घेऊन वाटप मंजूर केले जाते.

एका कुटुंबातील रक्ताच्या नात्या मध्ये म्हणजेच वडिलांकडून मुलाकडे अथवा वडिलांकडून मुलीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क हा भरावा लागत होता. तसेच आईकडून मुलाकडे अथवा आईकडून मुलीकडे सुद्धा हस्तांतर करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत होता. जमीन हस्तांतरण करत असताना आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाही. आता फक्त 100 रुपयाचे जमीन हस्तांतरणाचे वाटणीपत्र आता करता येणार आहे, त्यासाठी शासनाकडून या आधी एक परिपत्रक काढण्यात आले होते. ते आपण जाणून घेउयात….

यासाठी शासनाने काही मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत त्या आपण पाहुयात…

1) शासन परिपत्रक दिनांक 15/05/1997 प्रमाणे वाटणीपत्र ला लागणाऱ्या दस्तावर 100 रु. ऐवढे मुद्रांक शुल्क (कलम 46) विहीत करण्यात आलेले आहे.

2) वाटणी अर्जात नमुद केलेली मालमत्ता ही वडीलोपार्जीत असावी.

3) वाटणी अर्जात नमूद केलेली मालमत्ता ही वडीलोपार्जीत नसल्यास वडीलांनी / ज्या व्यक्तीस स्वतःच्या मालमत्तेची वाटणी करून द्यावयाची असेल त्या व्यक्तीने स्वतःच्या मालकीची (self Acquired / Separate Property) ला संयुक्त कूटुंब मालमत्ता म्हणून घोषीत करणे आवश्यक राहील. (नमूना सोबत जोडला आहे.)

4) बहिणींचा हिस्सा कायदयाप्रमाणे समान दिला जाईल याची दक्षता घ्यावी. कोणत्याही व्यक्तीने त्याच्या कायदेशीर हक्कानुसार प्राप्त होणाऱ्या शेत जमीनीवरील हक्क सोडून द्यावयाचा असल्यास अश्या व्यक्तीने स्वतःची ओळख पटवून तहसीलदारा समक्ष हजर राहून शपथेवर बयाण देणे आवश्यक आहे किंवा असे हक्क सोड पंजीकृत करणे आवश्यक आहे .

5) वाटणीपत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही (मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपिठ यांचेकडील श्री अरविंद देशपांडे यांचे प्रकरण याचीका क्र. 2814/02 , दिनांक 30/06/2003 प्रमाणे) परंतू भविष्यात वाद होवू नये म्हणून वाटणीपत्र नोंदणीकृत करता येईल व त्याकरीता नोंदणीचे शुल्क, नोंदणी कायदा 1908 प्रमाणे दयावा लागेल. सध्याच्या दरानुसार वाढणीतील सर्वात मोठा हिस्सा वगळन जी जमीन शिल्लक राहील त्या जमिनीच्या रेडी रेकनर दराच्या फक्त 1 % मूल्य नोंदणी साठि देय आहे.

6) नोंदणी कायदा 1908 च्या कलम 17 मध्ये तशी सुधारणा न झाल्यामुळे भविष्यात सदर जमीन वाटणीचा वाद निर्माण झाल्यास अनोंदणीकृत वाटणीपत्र विद्यमान न्यायालयात सिद्ध करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

6. पोट – हिश्याची मोजणी फी उपअधीक्षक भूमी अभिलेख ह्यांचे कडे जमा करावी.

7. अर्जासोबत असलेल्या सर्व विहित नमुन्यातील माहिती अर्जदाराणे स्वत भरावी जेणे करून कार्यालईन कर्मचार्याजचा वेळ वाचू शकेल.

तुम्ही या सर्व माग्रदर्शक सूचनांचे पालन करून 2014 चा संपूर्ण शासन परिपत्रक, PDF फॉर्म, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील मुद्रांक शुल्काबाबत परिपत्रक डाउनलोड करून सगळी माहिती काळजीपूर्वक वाचा..

आणि त्यानंतर PDF फॉर्म भरून कागदपत्रांसह तहसील कार्यालयाला भेट द्या…

PDF डाउनलोड करा. 

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील मुद्रांक शुल्काबाबत परिपत्रक :- PDF

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप, 2014 चं संपूर्ण शासन परिपत्रक :- PDF   

महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड1966 च्या कलम 85 प्रमाणे वाटणीच्या अर्जाचा नमुना :- PDF फॉर्म

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *