Take a fresh look at your lifestyle.

315Km रेंज वाली सर्वात स्वस्त Electric Carच्या बुकिंगसाठी गर्दी इतकी की, वेबसाइटचं झाली क्रॅश, पहिल्या 10,000 ग्राहकांना मिळणार ‘हे’ गिफ्ट

Tata Motorsने सोमवारी न्यू इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV चे बुकिंग सुरु केलं आहे. बुकिंग सुरू होताच लोकांमध्ये बुकिंग करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. Tata Motors ने सांगितले की, वेबसाइटला क्रॅश झाल्याने काही त्रुटी निर्माण झाल्या होत्या. कारण लोक Tiago.Ev साठी इतके वेडे झाले होते की, अचानक बुकिंग सुरु केल्याने लोड झाला होता.

Tata Motors चे एमडी शैलेश चंद्र यांनी एकानिवेदनात म्हटलं आहे की, आमच्या डीलरशिप आणि वेबसाइटला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. हजारो ग्राहक बुकिंगसाठी एकत्र येत आहेत, त्यामुळे आमची वेबसाइट स्लो झाली आहे. ते आता पूर्णपदावर आलं आहे.

Tata Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये आहे. कारच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.79 लाख रुपये आहे. ही कार एका पूर्ण चार्जवर 315Km पर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकते. ही कार 5.7 सेकंदात 0-60 Km प्रतितास वेग पकडते. Tata Tiago.EV मॉडेलची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

21,000 रुपयांमध्ये करा बुक…

जर तुम्ही ही कार बुक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला बुकिंगसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://tiagoev.tatamotors.com/ वर जावे लागेल.

येथे तुम्ही Book Now वर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

येथे प्रथम तुम्ही Tiago EV चे व्हेरियंट आणि नंतर कलर निवडा.

आता Checkout वर क्लिक करा.

आता तुमचा मोबाईल नंबर, नाव, ईमेल, पत्ता, डिटेल्स भरा. यानंतर, कायमस्वरूपी पार्किंग आणि बिलिंग पत्त्याची डिटेल्स देऊन पेमेंट करा. लक्षात घ्या की, बुकिंगची रक्कम 21,000 रुपये आहे.

315Km मिळेल रेंज :-

Tata Motors ने दोन बॅटरी पॅकसह Tiago EV लाँच केले आहे, ज्यामध्ये 19.2kWh बॅटरी पॅक आणि 24.kWh बॅटरी पॅक समाविष्ट आहे, इतकेच नाही तर त्यांच्याकडे 3.3 Kw AC आणि 7.2 Kw AC चार्जिंग ऑप्शन देखील आहेत. त्याच्या 19.2kWh बॅटरी पॅकच्या मदतीने, ती पूर्ण चार्ज केल्यावर 250Km ची रेंज देईल, तर त्याच्या 24kWh बॅटरी पॅकच्या मदतीने, ही कार पूर्ण चार्ज केल्यावर 315Km ची रेंज देईल. Tiago EV चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे – XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux. ZConnect कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी 45 कनेक्ट केलेल्या फीचर्ससह देखील स्टॅंडर्ड किटचा हिस्सा आहे.

फीचर्स :-

डिझाईन आणि साईझच्या बाबतीत, Tiago EV सध्याच्या पेट्रोल मॉडेलसारखेच आहे आणि जवळजवळ सर्व समान फीचर्स आहेत. मात्र त्यात काही किरकोळ बदलही करण्यात आले आहेत. या कारमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी Apple CarPlay, Android Auto ला सपोर्ट करते. कारमध्ये 5 जण आरामात बसू शकतात. सेफ्टीसाठी यामध्ये एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ईबीडी असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. टियागोला आधीच क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळालं आहे. ऑटो हेडलॅम्प, रेन सेन्सिंग वायपर्स, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि हरमन ऑडिओ सिस्टीम याशिवाय क्रूझ कंट्रोलसारखे फीचर्स कारमध्ये प्रथमच मिळत आहेत.

पहिल्या 10 हजार ग्राहकांना मिळतील हे फायदे

Tata Motors ने सांगितले की, Tata Tiago EV पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी रु. 8.49 लाख ते रु. 11.79 लाख (Ex-showroom) किंमतीसह लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन रेंजमधील हे सर्वात किफायतशीर वाहन आहे.