राष्ट्रीय वयोश्री योजना : माजी सभापती सुजाता पवार यांच्याकडून आढावा बैठक ; खा. डॉ.अमोल कोल्हेंकडून होणार सहाय्यक साधनांचं वाटप
शेतीशिवार टीम, 2 डिसेंबर 2021 : संसदरत्न, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधवांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना व एडीप योजनेअंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या पूर्वसंध्येला गीताई विष्णु मंगल कार्यालय, तळेगाव ढमढेरे व कन्यादान मंगल कार्यालय, न्हावरा येथे माजी सभापती सौ.सुजाता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांची आढावा बैठक संपन्न झाली.
या शिबिराचा नागरीकांना लाभ घेता यावा यासाठी घरोघरी जाऊन ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी मोनिकाताई हरगुडे, कुसुमताई मांढरे, विद्याताई भुजबळ, संपत ढमढेरे, शिरूर तालुका आरोग्य अधिकारी मोरे साहेब, गटविकास अधिकारी जगताप साहेब, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ देडंगे मॅडम आणि पाटोळे साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.