शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : राज्य सरकारने एक नवं परिपत्रक जारी करुन एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना 28 % महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे (House rent) देण्यात आले असून मूळ वेतनाच्या 3 % वार्षिक वेतनवाढ देण्याचाही निर्णय घेतला आहे. तसेच दर महिन्याच्या 10 तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. त्यानंतर राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वेतन वाढीची घोषणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन सरकार आणि एसटी महामंडळाने केले होते. शुक्रवारी 26 नोव्हेंबर रोजी 11 हजार 549 कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली होती.
एसटी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन कसं असेल ? जाणून घ्या
1. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये 7,200 रुपये वाढ होतील.
2. ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या वेतनात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.
3. दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात 5,760 रुपये वाढ होतील.
4. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह 3,600 रुपयांची वाढ मिळणार आहे.
विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टात असून एसटी कर्मचाऱ्यांनी कामगारांनी कामावर रुजू व्हावं. पगार वाढ केल्यांतरही काही कर्मचारी संप करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणा खपवून घेतली जाणार नाही. पैसे देऊनही संप चालू राहणार असल्यास काही अर्थ राहणार नाही.