शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, जस्त, ओमेगा -3 ऍसिडस् यांसारख्या गुणधर्मांनी समृद्ध दूध हा संपूर्ण आहार मानला जातो. दररोज 1 ग्लास दूध पिणे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.
परंतु त्यात काही गोष्टींचा समावेश केल्यास तुम्हाला दुहेरी फायदे मिळू शकतात. फक्त 2 गोष्टी दुधात मिसळून रोज प्यायल्याने हाडांची कमकुवतपणा तर दूर होईलच, पण सांधेदुखी, निद्रानाश, थकवा, अंधुक दृष्टी यासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहाल…
तर त्या दोन गोष्टी म्हणजे बदाम आणि तीळ.. जे आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. पण, ते दुधासोबत खाल्ल्याने तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतात. याचे सेवन कसे करायचं जाणून घ्या…
यासाठी तुम्हाला आवश्यक आहे
4 बदाम
चिमूटभर तीळ
1 ग्लास दूध
कस कराल सेवन :-
1. सर्वप्रथम बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची त्वचा काढून टाका.
2. तीळ कढईत भाजून बारीक वाटून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बारीक करून हवाबंद डब्यात साठवू शकता.
3. 1 ग्लास दूध उकळून त्यात बदाम आणि तीळ टाका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या दोन्ही गोष्टी दुधात उकळूनही घेऊ शकता.
हे पेय आरोग्यासाठी का आहे फायदेशीर :-
कॅन्सर पासून वाचवतं :-
संशोधनानुसार, दररोज या गोष्टींचे सेवन केल्याने शरीरात कॅन्सरच्या पेशी तयार होण्यापासून बचाव होतो. कोलेन कॅन्सरच्या धोका देखील यामुळे कमी होतो.
हाडे मजबूत होतात :-
यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, ज्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. यासोबतच सांधे, पाठ, गुडघेदुखीही दूर राहते. तसेच दात मजबूत होतात.
शुगर लेव्हल नियंत्रित राहते :-
दुधासोबत बदाम आणि तीळ खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मधुमेह असेल तर दररोज याचे सेवन करावं.
रक्ताची कमतरता होते दूर :-
लोह, तांबे आणि झिंक या तिन्ही गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात असल्याने शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. अँनिमिया त्रास असलेल्या लोकांसाठी आणि स्त्रीयांसाठी याचं सेवन खूपच फायदेशीर आहे.
स्मरणशक्ती वाढते :-
याचे दररोज सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळे अल्झायमरसारख्या आजारांचा धोका आणखी कमी होतो. त्याचबरोबर ते तुम्हाला तणाव, नैराश्यापासूनही दूर ठेवते…