शेतकऱ्यांसाठी विशेष योजना ! गावात Soil Testing Lab सुरु करण्यासाठी मिळवा 3.75 लाख रु. अनुदान; दरमहा होईल 20-30 हजारांची कमाई !

0

 कोरोना महामारीनंतर देशात नोकऱ्यांची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, कोरोनानंतर आता परिस्थिती सामान्य होत असली तरी रोजगाराच्या समस्येतून देश अद्याप बाहेर पडलेला नाही. लॉकडाऊनच्या वेळी, लोक मोठ्या संख्येने शहरांमधून त्यांच्या गावात स्थलांतरित झाले होते, त्यापैकी बरेच लोक अजूनही त्यांच्या गावाभोवती कामाच्या शोधात आहेत. जे लोक गावातच आपला रोजगार सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना केंद्र सरकारची हि योजना मदत करू शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःहून थोडी गुंतवणूक करावी लागेल, नंतर सरकार तुम्हाला मदत करेल. चला तर हि बिझनेस आयडिया पाहू…

Mini Soil Testing Lab : म्हणजेच माती परीक्षण प्रयोगशाळा केंद्र :-

सरकारच्या सॉईल हेल्थ कार्ड (Soil Health Card Scheme) योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर तुम्ही एक मिनी माती परीक्षण प्रयोगशाळा उघडू शकता. देशातील ग्रामीण भागात चाचणी प्रयोगशाळा फारच कमी असून गावातील शेतकरीही माती परीक्षण करून घेण्यासाठी जागरूक होत आहेत. तुम्हालाही शेतीची आवड असेल तर तुम्ही हे काम तुमच्या गावातच सुरू करू शकता. या कामात कमाईची भरपूर संधी आहे.

हा व्यवसाय कोण सुरु करू शकतं ?

ज्यांनी 10 वी नंतर एग्री क्लीनिक किंवा ITI मधून कृषी संबंधित प्रशिक्षण घेतले आहे, ते या विशेष योजनेसाठी अर्ज करू शकतील.या साठी तुमचे वय 18 ते 40 वर्षे असावे आणि तुमचे कुटुंब शेती व्यवसायाशी निगडीत असावे.

अर्जाची प्रक्रिया काय आहे ?

मिनी सॉइल टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कृषी उपसंचालकांशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही ऑनलाइनद्वारे देखील सरकारच्या soilhealth.dac.gov.in या वेबसाइटला भेट देऊन मृदा आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी संपर्क साधू शकता. चौकशीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 1800-180-1551 वर कॉल करू शकता. मृदा आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. यासंदर्भातील सर्व कार्यवाही जिल्ह्याच्या कृषी विभागाकडूनच केली जाणार आहे.

खर्च किती येईल ?

पंचायती मध्ये मिनी सॉईल हेल्थ कार्ड योजनेंतर्गत चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 75 टक्के रक्कम देते. जर तुम्हाला लॅब सुरू करायची असेल तर सरकारकडून तुम्हाला 3.75 लाख रुपये दिले जातील. हा व्यवसाय सुरू करून गावातच 20-30 हजार रुपये कमावता येतात.

शेतकऱ्यांना काय होणार फायदा :-

मातीचे आरोग्य
शेतीची उत्पादक क्षमता
पोषक तत्वांची उपस्थिती आणि पोषक तत्वांची कमतरता
आर्द्रतेचा अंश
उपस्थित इतर पोषक
शेतमालाची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे… ही सर्व माहिती शेतकऱ्यांना आपल्या मातीविषयी समजेल..

सॉइल हेल्थ कार्ड स्कीम : 2022 अंतर्गत कसं केलं जातं काम :-

सर्व प्रथम अधिकारी तुमच्या शेतातील मातीचे नमुने गोळा करतील.
त्यानंतर माती परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवली जाईल.
तेथे तज्ज्ञ मातीचे परीक्षण करून मातीची सर्व माहिती घेतात.
त्यानंतर ते वेगवेगळ्या मातीच्या नमुन्यांची ताकद आणि कमकुवतपणाची यादी करतील.
जमिनीत काही कमतरता असल्यास ती सुधारण्यासाठी खतांबाबत सूचना देतात.
त्यानंतर हा अहवाल शेतकऱ्याच्या नावासह ऑनलाइन अपलोड केला जातो.
जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांचा मातीचा अहवाल लवकरात लवकर पाहता येईल आणि त्यांच्या मोबाईलवरही माहिती दिली जाईल…

सॉइल हेल्थ कार्ड स्कीम : 2022 अंतर्गत अर्ज कसा करावा ?

सर्वप्रथम अर्जदाराला योजनेच्या ऑफिसियल वेबसाइट वर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या समोर उघडेल.

या होम पेजवर तुम्हाला Login पर्यायावर क्लिक करावे लागेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढील पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.

राज्य निवडल्यानंतर, तुम्हाला Continue बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर पुढील पेज उघडेल.

या पेजवर तुम्ही लॉगिन फॉर्म उघडाल, यामध्ये तुम्हाला खालील New Registration च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर, नोंदणी फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.

या नोंदणी फॉर्ममध्ये, तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की युजर्स संस्था तपशील, भाषा, युजर्स डिटेल्स, युजर्स लॉगिन, अकाउंट डिटेल्स इ.

सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. तुम्हाला मुख्यपृष्ठावर लॉगिन फॉर्म उघडावा लागेल.

लॉगिन फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही सॉइल हेल्थ कार्डसाठी अर्ज करू शकता…

Leave A Reply

Your email address will not be published.