केंद्र आणि राज्य शासनातर्फे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सर्वत्र राबविण्यात येत असून दौंड तालुक्यातील शेतीपूरक उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी केले आहे.
सदरची योजना ही शेतकरी उद्योजकांना उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण योजना असून दौंड तालुक्यातील 20 या योजनेचा लाभ सध्या मिळाला आहे. या योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी जसे शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना लाभ देय आहे.
योजना बँक कर्जाशी निगडित असून,वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% व कमाल 10 लाख मर्यादित व गट लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान देय आहे .
मार्केटिंग व ब्रँडिंगकरिता गट लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% अनुदान देय आहे. सदस्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेअंतर्गत शेतकरी उद्योजकांनी https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
किती मिळेल अनुदान :-
या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी व उद्योजकांना वैयक्तिक लाभासाठी 35% अनुदानासह 10 लाखांचं कर्ज मिळतं. तसेच या योजे अंतर्गत जो काही टेक्निकल सपोर्ट हवाय तो ही मिळणार आहे.
मार्केटिंग व ब्रॅन्डींगसाठी 50% अनुदान कमाल निधी केंद्र शासनाच्या विहीत मर्यादेत स्वयंसहाय्यता गटांतील सदस्यांना बीज भांडवल रु.40,000 / प्रति सदस्य ( ग्रामीणसाठी MSRLM व शहरीसाठी MSULM मार्फत )
इन्क्यूबेशन सेंटर अनुदान शासकीय संस्था- 100%, खाजगी संस्था – 50% अनुसुचित जाती व जमाती- 60%
प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांना 100% अनुदान
भांडवली गुंतवणुक व सामाईक पायाभूत सुविधा, गट लाभार्थी 35% अनुदान कमाल केंद्र शासनाच्या विहित मर्यादेत…
PMFME Scheme 2022 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रेशन कसे कराल ?
PMFME योजनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही प्रथम प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज योजनेच्या अधिकृत वेब पोर्टल https://www.mofpi.gov.in/ वर जावे (https://pmfme.mofpi.gov.in/).
या नंतर वेब पोर्टलमध्ये https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Login वर जा.
त्यानंतर ऑनलाइन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
साइन अप बटणावर क्लिक करा.
नवीन युजर्स रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.
सर्व माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
यशस्वी नोंदणीकृत युजर्सच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर युजर्स नेम आणि पासवर्डसह ईमेल प्राप्त होईल. रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरही मेसेज प्राप्त होईल.
युजर्स नेम आणि पासवर्ड मिळाल्यावर, युजर्स सिस्टममध्ये लॉग इन करू शकतो.
PMFME Scheme 2022 योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज कसा कराल ?
pmfme mofpi वेब पोर्टलवर जा.
त्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.
यूजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही पोर्टलवर लॉग इन कराल.
कृपया लक्षात घ्या की, तुम्ही तुमची विभाग निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचा प्रकार बदलता येणार नाही.
पोर्टलवर तुमची विभाग निवडा.
Apply Online बटणावर क्लिक करा.
ऑनलाइन अर्जावर क्लिक केल्यावर युजर्स 7 विभागांमध्ये स्वतंत्रपणे फॉर्म भरण्यास सक्षम असेल.
विभागांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
अर्जदार तपशील (Applicant details)
सध्याचा उद्योग उपक्रम
प्रस्तावित व्यवसाय वर्णन
आर्थिक विवरण
कर्ज देणारी बँक
कागदपत्रे अपलोड करा
घोषणा आणि सबमिट करा
सर्व माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा.
टीप :- जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यास अडचण येत असेल तर तुम्ही जनसेवा केंद्र (सेतू) ला सर्व कागदपत्रांसह भेट द्या.
फॉर्म मंजूर झाल्यांनतरराज्य नोडल एजन्सी प्रस्तावाचे मूल्यमापन करेल आणि राज्यस्तरीय मान्यता समिती (SLAC) च्या शिफारशीसह अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडे पाठवलं जाईल. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे प्रस्ताव पाठवला जाईल. सामायिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सहाय्यासाठी अर्ज करण्यासाठी हीच प्रक्रिया अवलंबली जाणार आहे.
देशातील अन्न प्रक्रिया क्षेत्र :-
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग : देशात असंघटित अन्न प्रक्रिया क्षेत्रात सुमारे 25 लाख अन्न प्रक्रिया उद्योग आहेत जे नोंदणीकृत आणि अनौपचारिक आहेत. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील रोजगारामध्ये असंघटित उद्योगाचा वाटा 74% आहे. यापैकी सुमारे 66% युनिट्स ग्रामीण भागात आहेत आणि सुमारे 80% कुटुंबावर आधारित उपक्रम आहेत जे ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेला आधार देतात आणि त्यांचे शहरी भागात स्थलांतर कमी करतात. हे बहुतेक सूक्ष्म उपक्रम आहेत.
या उद्योगांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांचे कार्य आणि वाढ मर्यादित राहते. या आव्हानांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची उपलब्धता, प्रशिक्षण, संस्थात्मक कर्जाची उपलब्धता, उत्पादनांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत ज्ञानाचा अभाव आणि ब्रँडिंग आणि विपणन कौशल्यांचा अभाव यांचा समावेश आहे. त्यामुळे असंघटित अन्न प्रक्रिया क्षेत्र प्रचंड क्षमता असूनही मूल्यवर्धन आणि उत्पादनाच्या बाबतीत फारच कमी योगदान मिळतं.
असंघटित अन्न प्रक्रिया सूक्ष्म उद्योग क्षेत्राचे योगदान आणि त्यांच्या कामगिरीमध्ये अडथळा आणणारी आव्हाने लक्षात घेऊन, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने समर्थन आणि सेवांच्या पॅकेजद्वारे PMFME – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजना” सुरू केली आहे.
2 Responses