Army / Air Force / Navy भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी !
शेतीशिवार टीम, 28 मे 2022 :– Tour of Duty Recruitment : देशातील लष्करी स्तरावरील भरती प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. सैन्यात भरतीसाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत. आता भारतीय लष्करातील नोकरी (Army) ,Air Force आणि नौदलातील (Navy) सैनिकांची सर्व भरती टूर ऑफ ड्यूटी (ToD) अंतर्गत होणार आहे. या योजनेअंतर्गत, लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीन सेवांमध्ये भरतीच्या नवीन सिस्टिममध्ये काही बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tour of Duty च्या अंतिम स्वरूपावर बरीच चर्चा झाली आहे, आणि काही नवीन सूचना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
लष्कर भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार (Indian Army Recruitment Rules) Army मध्ये 4 वर्षांसाठी भरती होतील आणि त्यानंतर सर्वजण सेवानिवृत्त होतील. परंतु, यापैकी 25% सैनिक पूर्ण सेवेसाठी पुन्हा शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.
Army Recruitment Rules : लवकरच जारी केले जातील नवीन नियम…
Tour of Duty योजनेच्या अंतिम स्वरूपावर चर्चा झाली असून लवकरच त्याची घोषणा केली जाऊ शकते. भारतीय लष्कराच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही शाखांमध्ये नवीन जवानांच्या भरतीसाठी नवीन सूचना प्रस्तावित करण्यात आल्या असून त्या स्वीकारल्या जाण्याची शक्यता आहे. नवीन भरती योजना आता कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे.
Indian Army त फक्त 4 वर्षांसाठी होता येणार भरती !
लष्करातील भरतीसाठी प्रस्तावित नियमांमध्ये बदल करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या आहेत. यापूर्वी Tour of Duty अंतर्गत देशातील नागरिकांना तीन वर्षांसाठी भारतीय लष्करात भरती होण्याचे सांगण्यात येत होते. आता चार वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर या सैनिकांच्या कार्यमुक्तीच्या तारखेपासून सुमारे 30 दिवसांचा कालावधी असून, त्यापैकी 25% सैनिकांना परत बोलावून नव्या तारखेसह पुन्हा सैनिक म्हणून दाखल केले जाईल.
वेतन आणि पेन्शन निश्चित करण्यासाठी मागील 4 वर्षांच्या कंत्राटी सेवेची गणना पूर्ण केलेल्या सेवेमध्ये केली जाणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांचं म्हणणं आहे की, तिन्ही सेवेतील सैनिकांच्या काही ट्रेड्सला काही अपवाद असतील, ज्यात त्यांच्या नोकरीच्या तांत्रिक स्वरूपामुळे त्यांना 4 वर्षांच्या कंत्राटी सेवेच्या पलीकडे ठेवता येणार आहे. यामध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असू शकतो…
होऊ शकतात हे महत्वपूर्ण बदल :-
सैन्यातील सैनिकांचे सरासरी वय 35-36 वर्षे असते, परंतु टूर ऑफ ड्यूटी (ToD) लागू झाल्यानंतर 4-5 वर्षांमध्ये सैनिकांचे सरासरी वय 25-26 वर्षे होईल. त्याच वेळी, असे सांगण्यात येत आहे की, कनिष्ठ आयोग अधिकारी (JCO) आणि इतर रँक (OR) अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनचा भार लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांपेक्षा जास्त आहे, आणि अशा परिस्थितीत ToD ची अंमलबजावणीची प्रक्रिया लागू झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल…
कधी सुरु होणार भरती प्रक्रिया :-
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर लवकरच रखडलेली भरती सुरू करणार आहे. ऑगस्टपासून ते पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे, जी डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. भारतीय लष्कराच्या मुख्यालयातून यासाठी विशेष कॅलेंडर तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर हिंदुस्तान टाईम्सला ही माहिती मिळाली आहे, अल्पकालीन सेवा भरतीसाठीच्या प्रक्रियेला Tour of Duty’ असं नाव देण्यात आले आहे.