Take a fresh look at your lifestyle.

Ashes Series : सकाळी 6.30 वाजेपर्यंत AUS-ENG चे खेळाडू दारू पार्टी दंग, अन् तितक्यात पोलिसांची एंट्री. पहा VIDEO…

शेतीशिवार टीम, 18 जानेवारी 2022 : अ‍ॅशेस मालिका संपल्यानंतर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे खेळाडू पार्टी करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत असून यात चक्क ऑस्ट्रेलियन खेळाडू इंग्लंडच्या खेळाडूंसोबत पार्टीचा आनंद घेताना दिसून आले आहे.

होबार्ट मधील हॉटेलच्या गच्चीवर ही पार्टी चालल्याचं समोर आलं असून ही दारु पार्टी पोलिसांनी उधळून लावल्याचं दिसतंय. या पार्टीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 3 खेळाडू ते नॅथन लायन, ट्रॅव्हिस हेड, अ‍ॅलेक्स कॅरी तर इंग्लंडकडून इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि पेस बॉलर जेम्स अँडरसन असल्याचं दिसून येत आहे.

यामध्ये लायन आणि कॅरी हे तर ऑस्ट्रेलियन जर्सीमध्येच पार्टीचा आनंद घेताना दिसून आले. यावेळी पोलिसांनी अचानक पार्टी सुरु असताना एंट्री केली अन् खेळाडूंची तारांबळ उडाली. एका अधिकाऱ्याने पोलिसांनी पार्टीवर कारवाई करतानाचा व्हिडिओ बनवला असून तो व्हायरल होत आहे.

भिंतीवरील घड्याळात सकाळचे 6.30 वाजताना दिसून येत असून रविवारी अ‍ॅशेस मालिका संपल्यानंतर या खेळाडूंनी रात्रभर पार्टी केल्याचं दिसून येतंय. यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने त्यांना बजावले की, तुमचा खूपच आवाज येत असून तो आजूबाजूला असणाऱ्या लोकांना डिस्टर्ब् करत आहे…

आता तुमची पॅकअप करण्याची वेळ झाले असून तुम्ही इथून तुमच्या रूममध्ये जा, धन्यवाद… असं बोलताच क्रिकेटपटुंनी पार्टी बंद केली व तिथून काढता पाय घेतल्याचं दिसून येत आहे.