Take a fresh look at your lifestyle.

शेवटचा चेंडू हव्या होत्या 6 धावा, समोर ट्रेंट बोल्ट…आता तुम्हीच पहा पुढं काय घडलं – Video

शेतीशिवार टीम, 23 डिसेंबर 2021 : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ एक अर्धशतक झळकावलं आहे, परंतु आज त्याने जे केले ते खरोखरच आश्चर्यकारक होतं.

शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बोल्टने आपल्या संघाला सुपर स्मॅश स्पर्धेत विजय मिळवून दिला. विशेष बाब म्हणजे नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स संघाला शेवटच्या चेंडूवर फक्त 6 धावांची गरज होती.

समोर ट्रेंट बोल्ट होता त्यामुळे एक बॉलर असलेला खेळाडू षटकार मारेल कोणी कल्पनाही केली नसेल परंतु त्याने लगवलेला षटकार पाहून सर्व जण आश्चर्य चकित झाले.

सर्वात विशेष म्हणजे शेवटच्या षटकातच नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स संघाने 3 विकेट गमावल्या पण बोल्टने कॅंटरबरीचे विजयाचे स्वप्न भंगवलं. कॅंटरबरी संघ 17.2 षटकांत सर्वबाद 107 धावांत आटोपला. अशा स्थितीत नॉर्दर्नचा संघ बलाढय़ दिसत असला तरी लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला.

नॉर्दर्नचा संघ एका वेळी 5 बाद 98 धावांवर खेळत होता, पण 6 चेंडूत पुढील 4 विकेट गमावल्या. एड नॅटलच्या डावातील शेवटच्या षटकातील पहिल्या 2 चेंडूत 2 विकेट पडल्या. त्याने अनुराग वर्मा आणि नंतर ईश सोधी (21) याला शिकार बनवलं. षटकाच्या चौथ्या चेंडूवर जो वॉकर (0)ही पॅव्हेलियनमध्ये परतला.

डावाच्या शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 6 धावांची गरज होती. ट्रेंट बोल्ट नतालच्या चेंडूला सामोरे जात होता. त्यानंतर त्याने एरियल शॉट खेळला आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला.

तो 2 चेंडू खेळून 7 धावांवर नाबाद परतला. बोल्टनेही या सामन्यात 2 बळी घेत 1 गडी राखून रोमहर्षक विजयात मोलाचे योगदान दिलं.