शेतीशिवार टीम, 18 जुलै 2021 :- कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) एसएससी जीडी कॉन्स्टेबलच्या (SSC GD Constable) 25271 पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जुलै 2021 पासून सुरू झाली आहे. उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करू शकतात. अधिकृत सूचना (official notification) पूर्णपणे वाचल्यानंतरच अर्ज करा.

असा करा अर्ज :-
सर्व प्रथम, कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
येथे अर्जासाठी मोबाईल नंबर आणि मेल आयडी टाकून नोंदणी करा.
आता होम पेजवर दिलेल्या APPLY सेक्शनवर क्लिक करा.
आता नवीन पेजवर Constable – GD च्या लिंक वर क्लिक करा.
येथे विचारलेली माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

शैक्षणिक पात्रता (educational eligibility) :-
या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून (Recognized Board) दहावी उत्तीर्ण केलेली असावी. अधिक शैक्षणिक पात्रतेशी संबंधित माहितीसाठी उमेदवार कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या अधिसूचना पाहू शकतात.

या पदांवर होतील भरत्या :-
SSC च्या या भरत्या परीक्षेच्या माध्यमातून दिल्ली पोलिस (Delhi Police), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (capf), राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA), सचिवालय सुरक्षा दल (ssf) आणि आसाम रायफल्समध्ये 25271 पदांची भरती होईल.

वयोमर्यादा (Age limit) :-
या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असावे. त्याचबरोबर OBC category मधील उमेदवारांना तीन वर्षांची आणि SC आणि ST category मधील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया (Selection process) :-
सीबीटी परीक्षा (CBT exam), पीईटी परीक्षा (PET exam) आणि पीएसटी परीक्षेच्या (PST exam) आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा (Important dates) :-
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 जुलै 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 ऑगस्ट 2021
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 2 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाइट – ssc.nic.in.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/]
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *