Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्यव्यापी मेळावा; शरद पवार, अजित पवार 23-24 नोव्हेंबरला महाबळेश्वरात , राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जय्यत तयारी…

0

महाअपडेट टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राज्यात सध्या विधानपरिदेसह जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धूम सुरु आहे. तसेच पुढील वर्षात मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरातील महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने कंबर कसली असून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. येत्या 23 आणि 24 नोव्हेंबरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्यव्यापी मेळावा महाबळेश्वर येथे होणार आहे.

मेळाव्यात राज्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच सातारा मतदारसंघातील कार्यकर्ते, स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन होणार असल्याचे स्पष्ट आहे.

या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्वतः शरद पवार आणि अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान पुढील वर्षात महापालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी आखायला स्वतः शरद पवारांनी लक्ष घातले आहे. पुणे – पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या या दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.