शेतीशिवार टीम : 30 ऑगस्ट 2022 : पारंपारिक भात शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत शेतीमध्ये विविध प्रयोग करणारे मावळ तालुक्यातील चांदखेड गावचे प्रगतशील शेतकरी प्रथमेश संतोष गायकवाड यांचा प्रवास हा तरुणांना प्रेरणादायी ठरणारा आहे. घरची दहा एकर शेती असून त्यामध्ये भात गहू सोयाबीन अशी पारंपरिक पिके केले जात होते मात्र शिक्षणाचा उपयोग करत प्रथमेश गायकवाड यांनी त्यामध्ये बदल केला पारंपारिक शेती करताना ती फारशी परवडत नव्हती मात्र त्यामध्ये आधुनिक प्रयोग करून शेती फायद्यात आणली आहे.

प्रथमेश यांनी सूर्यफुलाचे उत्पादन घेतले यालाच ‘डेकोरेट फ्लॉवर’ असेही म्हणतात. मार्केटचा अंदाज घेण्यासाठी पहिल्या वर्षी थोड्या प्रमाणात लागवड केली होती, मात्र त्यानंतर त्यांना दुसऱ्या वर्षी उत्पादन वाढवले परिणामी उत्पादकतेत वाढ झाली आहे. या फुलास गणेशोत्सव आणि लग्नसराईमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे लक्षात घेऊन लागवडीचे नियोजन अत्यंत अभ्यासपूर्ण केले.

या दरम्यान, बाजार भाव देखील चांगला असतो या फुलांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो तसेच खते व औषधांसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. 20 × 20 सेंटीमीटर वर डेकोरेट फ्लॉवरची लागवड केली जाते लागवडीनंतर 50 ते 60 दिवसांत दरम्यान उत्पादन सुरू होते त्यानंतर प्रत्येक फुलाचे पॅकिंग करून देशभरात फुले विक्रीसाठी पाठविली जातात.

पाच फुलांची एक गट तयार केले जाते प्रत्येक फुलाला कागदी पेपरने पॅक केले जाते. नंतर बॉक्समध्ये आकर्षक पद्धतीने पॅकिंग केले जाते. मुंबई आणि पुणे येथील बाजारपेठ नियमित फुले विक्रीसाठी येतात तसेच मागणीनुसार बेंगलोर आणि सुरत मार्केटला पाठवली जातात. एका फुलाला सरासरी 10 ते 15 रुपये बाजारभाव मिळतो. खर्च वजा जाता एकरी 1.50 ते 2 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. त्या फुलांची शेती करताना मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते यावर मावा, तुडतुडे, पाने खाणारी आळी यांसारख्या किडीचा पादुर्भाव होण्याची शक्यता असते.

तसेच वातावरणातील बदलांमुळे करपा व मूळकूज या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे फुलांच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्यामुळे या सर्व बाबींची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची मोलाची मदत होते.

याशिवाय डेकोरेटिव्ह काबीज स्नेप ड्रेगन या फुलांचे उत्पादन गायकवाड घेतात. सनफ्लावर उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. त्या फुलांचे बियाणे ही जपान मधून आयात करावी लागतात. तसेच पारंपारिक शेतीला जोडधंदा म्हणून स्ट्रॉबेरी आणि पारंपारिक शेतीची शेती केली जात आहे. सर्व करत असताना शेतीतून पूर्वी जेमतेम उत्पन्न मिळतं होतं. मात्र शेतीमध्ये विविध फुलांचे आधुनिकतेने उत्पादन घेणे सुरू केल्यानंतर उत्पादनातही वाढ झाली असल्याचे प्रथमेश गायकवाड यांनी आवर्जून सांगितले.

तसेच शिक्षण सुरू असतानाच त्यांनी शेतीमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. प्रथमेश करत असलेली शेती तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते तरुणांनीही नोकरीची वाट न धरता स्वतःच्या शेतीत लक्ष घालून स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यास त्यांना बेरोजगाराची समस्या जाणवणार नाही.

मला सुरवातीपासूनच शेतीची आवड आहे पारंपरिक शेतीतून कुटुंबाला फारसे उत्पन्न मिळत नव्हते त्यामुळे माझ्या शिक्षणाचा उपयोग सुरुवातीला स्वतःच्या कुटुंबासाठी करण्याचे ठरवले आणि त्यातूनच शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली आणि या साठी कुटुंबाचा पाठिंबा मिळाला त्यामुळे आर्थिक उत्पादनात वाढ झाली.

प्रथमेश संतोष गायकवाड ( प्रगतशील शेतकरी, चांदखेड )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *