Take a fresh look at your lifestyle.

Electric Scooter : 120Km रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च ; टॉप स्पीड 100 kmph

शेतीशिवार टीम, 25 डिसेंबर 2021 : नवीन इलेक्ट्रिक कंपनी EVTRIC Motors – ने EV इंडिया एक्सपो 2021 मध्ये 3 नव्या इलेक्ट्रिक टू – व्हीलर EVTRIC Rise । EVTRIC Mighty। EVTRIC Ride Pro लॉंच केल्या आहेत.

विशेष बाब, म्हणजे या इलेक्ट्रिक स्कुटर 100 Km इतका टॉप स्पीड आणि 120 Km पर्यंतची रेंज मिळते. सध्या कंपनीने त्यांची किंमत जाहीर केलेली नसली तरी त्याचे फीचर्स जाणून घेऊयात…

एव्हर्टिक राईस (EVTRIC Rise) :-

ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक आहे, जी हाय रेंज टेक्नोलॉजी सह एलिगेंट स्टाइलिंगसह येते. चार्जिंगमुळे लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कंपनीने बाइकमध्ये रिमूव्हेबल बॅटरीची सुविधा दिली आहे. यात 3.0 KWH लिथियम-आयन बॅटरी आहे. बाइकचा टॉप स्पीड 100 Km असेल आणि एकदा चार्जवर
केल्यावर 120 Km पेक्षा जास्त प्रवास करण्यास सक्षम असणार आहे.

एव्हर्टिक माईटी (EVTRIC Mighty) :-

ही कंपनीची हायस्पीड स्कूटर आहे, जी स्टायलिश आणि आरामदायी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 70 Km असेल आणि ते एका चार्जवर 90 Km पर्यंत धावण्यास सक्षम आहे.

एव्हर्टिक राइड प्रो (EVTRIC Ride Pro) :-

ही कंपनीची आणखी एक हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 75 Km आणि ते एका चार्जवर 90 Km पर्यंत धावण्यास सक्षम आहे. राइड प्रो (Ride Pro) ही कंपनीने ऑगस्टमध्ये लॉन्च केलेल्या EVTRIC राइडची हाय परफॉर्मेंस व्हर्जन आहे.