Take a fresh look at your lifestyle.

Kia Carens ला थेट टक्कर देणारी ‘ही’ MPV लॉन्च । पहा, फीचर्स किंमत अन् संपूर्ण डिटेल्स…

शेतीशिवार टीम, 22 एप्रिल 2022 :- मारुती सुझुकीने त्यांची Maruti Suzuki XL6 2022 MPV काल गुरुवारी अधिकृतपणे लॉन्च करण्यात आली आहे. मारुतीच्या नवीनतम XL6 ला एक्स्टेरियर प्रोफाइलसाठी अनेक व्हिज्युअल अपडेट केले आहे. विशेष म्हणजे, कारच्या केबिनमध्ये एक अपडेटेड फीचर लिस्ट आणि नवीन 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळतं, जे 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला मिळते.

प्रीमियम 6-सीटर कार…

XL6 ही मारुती सुझुकी एर्टिगा (Ertiga) 7-सीटर MPV ची प्रीमियम 6-सीटर व्हर्जन आहे. XL6 पहिल्यांदा 2019 मध्ये बाजारात लाँच झाली होती. मारुतीने Ertiga ला ही या महिन्याच्या सुरुवातीला अपडेट केलं होतं. पण नवीन अपडेट केलेल्या XL6 मारुतीला MPV सेगमेंटमध्ये आपली हिस्सेदारी वाढवण्यास मदत करेल, ज्यामध्ये आता Kia Carens समाविष्ट आहे. परंतु कारची किंमत रु. 9.59 लाख ते रु. 16.59 लाख (Ex-showroom) किंमत श्रेणीमध्ये असली तरी, XL6 ची किंमत अजून थोडी जास्त असू शकते.

इंजिन पॉवर आणि गिअरबॉक्स :-

नवीन मारुती XL6 मध्ये नेक्स्ट जनरेशन K-Series ड्युअल-जेट पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 103 hp पॉवर आणि 136.8 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सर्व-नवीन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेलं आहे. कारची कार्यक्षमता सुधारण्यासाठी NVH स्तरावर चांगले नियंत्रण, कमी उत्सर्जन आणि अधिक गियर बदलाचे पर्याय असल्याचा दावाही मारुतीने केला आहे…

XL6 तीन व्हेरियंट मध्ये उपलब्ध ;-

XL6 Zeta, Alpha आणि Alpha Plus या तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली असून ही कार मारुतीच्या प्रीमियम नेक्सा नेटवर्कद्वारे विकली जाते.

किती आहे किंमत :-

2022 मारुती सुझुकी XL6 च्या मॅन्युअल ट्रान्समिशनसह Zeta व्हेरियंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.29 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ड्युअल टोन कलर थीमसह अल्फा+ व्हेरियंटसाठी 14.55 लाख रुपये (Ex-showroom) पर्यंत आहे.

बुकिंग डिटेल्स :-

मारुती सुझुकीने आधीच XL6 फेसलिफ्टसाठी बुकिंग सुरू केलं आहे. ही कार 11,000 रुपयांचे पेमेंट देऊन बुक केली जाऊ शकते. ही प्रीमियम MPV कार खरेदी करू इच्छिणारे ग्राहक कोणत्याही NEXA शोरूम किंवा अधिकृत NEXA वेबसाइटवर लॉग इन करून ती बुक करू शकतात…

लुक आणि डिजाइनमध्ये काय झाला बदल…

लेटेस्ट XL6 बद्दल बोलायचं तर, त्याच्या एक्सटेरियर बॉडी स्टाइलमध्ये बरेच छोटे परंतु महत्त्वाचे बदल आहेत. पुढील ग्रिल अधिक क्रोम गार्निशसह अपडेट केलं गेलं आहे. कारच्या साईडला आणि रियरला अँडिशनल क्रोम गार्निश उपलब्ध आहे. तसेच, कार आता मोठ्या ड्युअल-टोन 16-इंच अलॉय व्हीलसह आली आहे.

इंटेरियर आणि फीचर्स :-

XL6 ची केबिन नेहमीच त्याची एक ताकद राहिली आहे. नेहमीप्रमाणे, 6 लोकांसाठी एक मोठी केबिन मिळते. कंपनीने ते फीचर्स आणि सुविधा या दोन्ही बाबतीत अपडेट केले आहे. मारुतीच्या ग्राहकांकडून व्हेंटिलेटेड फ्रंट सीटची मागणी फार पूर्वीपासून होती आणि XL6 हे फीचर्स समाविष्ट करणारे ब्रँडचे पहिले मॉडेल ठरले आहे. XL6 मध्ये अपडेटेड 7.0-इंच डिस्प्ले स्क्रीन आहे. सुझुकी कनेक्ट मॉडेलमध्ये सुमारे 40 कनेक्ट केलेल्या फीचर्ससह प्रवेश करत आहे.

सेफ्टी फीचर्स :-

नवीन XL6 MPV कारला अनेक महत्त्वाचे सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहे. या फीचर्सच्या सूचीमध्ये 360-डिग्री कॅमेरा समाविष्ट आहे, जो या वर्षाच्या सुरुवातीला अपडेट केलेल्या बलेनोमध्ये प्रथम दिसला होता. हे नवीनतम HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यात 4 एअरबॅग मिळतात – ड्युअल फ्रंट आणि ड्युअल फ्रंट साइड, ABS आणि EBS मिळत आहे. याशिवाय लो प्रेशर अलर्ट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम सारख्या इतर अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

थेट Kia Carens ला देणार टक्कर…

भारतीय कार बाजारात, Maruti Suzuki XL6 MPV थेट Kia Carens (Kia Carens) शी स्पर्धा करते. पण अप्रत्यक्षपणे, XL6 रेनॉल्ट ट्रायबर (रेनो ट्रायबर), महिंद्रा XUV700 (महिंद्रा XUV700), टाटा सफारी (Tata Safari) आणि ह्युंदाई अल्काझार (Hyundai Alcazar) यांच्याशी देखील स्पर्धा करते…