Take a fresh look at your lifestyle.

6 लाखांपेक्षा स्वस्तात मस्त ‘या’ SUV वर ग्राहक फिदा ; डिमांड इतकी की, 26 हप्त्यांपर्यंत पोहचला वेटिंग पिरियड…

शेतीशिवार टीम : 29 जुलै 2022 :- स्पोर्ट यूटिलिटी व्हीकल (SUV) वाहनांची क्रेझ भारतीय ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जास्ततर लोकं हॅचबॅक कारमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी कॉम्पॅक्ट SUV वाहनांची निवड करत आहेत. ग्राहकांचा हा वाढता कल लक्षात घेऊन ऑटोमेकर्स या सेगमेंटमध्ये एकापेक्षा जास्त वाहने लॉन्च केली आहेत.

अलीकडे पाहता, टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त SUV टाटा पंच (Tata Punch) मार्केट मध्ये आणली आहे,अतिशय आकर्षक लुक आणि दमदार इंजिन क्षमतेने सजलेली ही SUV लोकांना फार आवडते. या SUV ची मागणी अशी आहे की त्याच्या काही व्हेरिएंटचा वाट पाहण्याचा कालावधी 24 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे, म्हणजे जवळपास 2 वर्षे.

कोणत्या व्हेरिएंटला जास्त मागणी आहे:

SUV एकूण चार व्हेरिएंटमध्ये येते, ज्यामध्ये Pure, Adventure, Accomplished आणि Creative यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Accomplished आणि Creative च्या मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेलसाठी 3 ते 5 महिने आणि ऑटोमेटिक व्हेरियंटसाठी 6 ते 8 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. Adventure मॅन्युअल व्हेरियंटसाठी 6 ते 10 आठवडे आणि ऑटोमॅटिकसाठी 10 ते 12 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. मॅन्युअल मॉडेलला डिलिव्हरीसाठी 24 ते 26 आठवडे प्रतीक्षा करावी लागणार असल्याने प्योर व्हेरिएंटला सर्वाधिक मागणी आहे.

कशी आहे न्यू टाटा पंच (Tata Punch) :

टाटा पंच हे कंपनीने विकले जाणारे सर्वात स्वस्त एसयूव्ही मॉडेल आहे.एकूण चार ट्रिम्स Pure, Adventure, Accomplished आणि Creative व्हेरियंटमध्ये कंपनीने ही मायक्रो-SUV प्रास्ताविक किंमतीसह लॉन्च केली आहे.

त्याची किंमत 5.93 लाख ते 9.49 लाख रुपये आहे. कंपनी पुढील महिन्यात त्याची किंमत वाढवू शकते असे वृत्त आहे. ही 5-सीटर SUV देखील सेफ्टीसाठी बनवण्यात आली आहे, याला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

कंपनीने त्यात 1.2-लीटर क्षमता असलेले पेट्रोल इंजिन वापरले आहे,जे 86PS पॉवर आणि 113Nm जनरेट करते.Altroz ​मध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. या SUV ची खास गोष्ट म्हणजे याला 187mm चा ग्राउंड क्लीयरेंस देण्यात आला आहे.

खास फिचर्सच्या बाबतीत, यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,ऑटोमॅटिक एअर कंडिशन (एसी),ऑटोमॅटिक हेडलाइट आणि वायपर्स, क्रूझ कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स फीचर्स सह मिळेल. (EBD). ब्रेक असिस्ट, रियर पार्किंग कॅमेरा यांसारखी फीचर्ससह देण्यात आली आहेत. सर्वसाधारणपणे, ही SUV 19 kmpl पर्यंत मायलेज देते.