Take a fresh look at your lifestyle.

elctric scooter असावी तर अशी ! आठवड्यातून करा फक्त 2 वेळा चार्ज ; दिवसभर पळवा खर्च फक्त 3 रुपये ; पहा फीचर्स अन् किंमत..

शेतीशिवार टीम : 19 जुलै 2022 :- इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी त्याच्या रेंजवर आणि किलोमीटर प्रमाणे येणाऱ्या खर्चावर अवलंबून असते. अलीकडे बाजारात अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक स्कूटर आल्या आहेत आणि अजूनही येत आहे, परंतु टीव्हीएसचा (TVS) दावा आहे की त्यांच्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरचा दररोज फक्त 3 रुपये इतका खर्च आहे. होय.. तुम्ही 3 रुपयांत दिवसभर फिरू शकता. सोबतच TVS ने 3 रुपये खर्चून 30Km धावण्याचा दावा केला आहे. या दाव्यामागे काय गणित आहे ? खरंच ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्याचा खर्च फक्त 3 रुपये प्रतिदिन आहे. तसे असल्यास ते Ola S1 Pro, Bajaj Chetak Electric, Okinawa सारख्या कंपन्यांना मागे टाकू शकते का ? टीव्हीएसचे हे गणित समजून घेऊया…

iQube 3 रुपयांत दिवसभर चालण्यामागचं गणित – 

TVS Motors ने iQube च्या अधिकृत पेजवर आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत स्पष्ट केली आहे. ट्रोल वाहनासाठी प्रतिलिटर 100 रुपये खर्च करावे लागतात, असे कंपनीचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल स्कूटरवर 50,000Km चालण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो. तर त्यांच्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरवरून 50,000Km प्रवास करण्यासाठी केवळ 6,466 रुपये इतका खर्च येईल. तसेच, GST ची सेविंग होते. सर्विस आणि मेंटेनेंस खर्चही वाचतो. अशाप्रकारे iQube 50,000 किमीवर 93,500 रुपयांची बचत करते.

TVS ने iQube च्या सिंगल चार्जची किंमत 18.75 रुपये असल्याचा दावाही केला आहे .त्यांचे iQube ST मॉडेल 4 तास आणि 6 मिनिटांत पूर्ण चार्ज होते. यानंतर 145km पर्यंत चालवता येतं. म्हणजेच, जर तुम्ही दररोज 30Km स्कूटर चालवाल असाल तर ही इलेक्ट्रिक स्कूटर आठवड्यातून दोनदा चार्ज करावी लागेल. दोनदा चार्जिंगचा खर्च 37.50 रुपये असेल.म्हणजेच सरासरी मासिक खर्च 150 रुपये आहे. म्हणजेच प्रत्येक दिवसाचा खर्च 3रु. येईल. तसेच दोनदा चार्ज केल्यावर स्कूटरची रेंज 290Km इतकी होईल. म्हणजेच, या खर्चावर तुम्ही दररोज सरासरी 30Km आरामात फिरू शकता…

TVS iQube ची किंमत :-

TVS iQube च्या बेस व्हेरियंटची ऑन-रोड किंमत रु. 98,654 पासून सुरू होते. सर्व किमती FAME II सबसिडीनंतर च्या आहेत. यावर सुमारे 51,000 रुपयांची सबसिडी ग्राहकांना दिली जात आहे. या स्कूटर्स 33 शहरांमध्ये उपलब्ध आहेत. लवकरच 52 नवीन शहरांमध्ये लॉन्च केल्या जातील.TVS iQube ST च्या अधिकृत वेबसाइटवरून प्री-बुकिंग करता येणार आहे.

TVS iQube चे फीचर्स :-

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर 7 इंच TFT टचस्क्रीन, क्लीन UI, इन्फिनिटी थीम पर्सनलायझेशन, व्हॉईस असिस्ट, अलेक्सा स्किलसेट, इंट्यूटिव्ह म्युझिक प्लेअर कंट्रोल, OTA अपडेट्स, प्लग-अँड-प्ले कॅरी विथ चार्जर, फास्ट चार्जिंग,सेफ्टी इन्फरमेशन. जसे की ब्लूटूथ आणि क्लाउड कनेक्टिव्हिटी ऑप्शन, 32 लिटर स्टोरेज स्पेस. अशे फीचर्स या स्कूटर मध्ये देण्यात आले आहेत.

TVS iQube ST :

टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरीयंट, TVS iQube ST 5.1 kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे आणि याची रेंज 140Km आहे. TVS iCube ST मध्ये 7-इंचाची TFT टच स्क्रीन 5-वे जॉयस्टिक इंटरॅक्टिव्हिटी,इंटरेक्शन, म्यूजिक कंट्रोल, थीम पर्सनलाइजेशन, व्हीकल हेल्थ सोबतच प्रोटेक्टीव नोटीफीकेशन, 4G टेलिमॅटिक्स आणि OTA अपडेट्स आहेत. स्कूटर थीम पर्सनलायझेशन, व्हॉईस असिस्ट आणि अलेक्सा स्किलसेटसह येते. TVS iQube ST चार नवीन कलर ओपशन्स मध्ये उपलब्ध आहे, हि 1.5kW फास्ट-चार्जिंग आणि 32L अंडर सीट स्टोरेजसह येते.

TVS iQube S :

TVS iQube S व्हेरीयंट, 3.4 kWh बॅटरीसह येते. पूर्ण चार्ज केल्यावर याची रेंज 100Km आहे. TVS iCube S 7-इंच टीएफटी,इंटरेक्शन, म्यूजिक कंट्रोल, थीम पर्सनलाइजेशन, व्हीकल हेल्थ ,या सारख्या फीचर्ससह येते. TVS iQube S चार कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

TVS iQube :

TVS iQube च्या बेस व्हर्जनमध्ये 3.4 kWh ची बॅटरी आहे. पूर्ण चार्ज केल्यावर याची रेंज 100Km आहे. यात 5-इंचाचा TFT टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन असिस्ट आहे.TVS iQube चे बेस व्हेरिएंट देखील तीन कलर ओपशन्स सह येते. यामध्ये दिलेले TVS SMARTXONNECT प्लॅटफॉर्म फीचर्स जसे की उत्तम नेव्हिगेशन सिस्टीम, टेलिमॅटिक्स युनिट, अँटी थेफ्ट आणि जिओफेन्सिंग देते.