Take a fresh look at your lifestyle.

‘या’ इलेक्टिक SUV ने ग्राहकांना लावलं वेड ; फक्त 2 चं तासांत विकल्या ‘इतक्या’ SUVs , रेंज 418 Km पहा फीचर्स अन् किंमत…

शेतीशिवार टीम : 29 जुलै 2022 :- Volvo Cars India ने शेवटी भारतामध्ये Volvo XC40 रिचार्ज (Volvo XC40 Recharge) प्योर इलेक्ट्रिक SUV 55.9 लाख रुपये (Ex-showroom) लाँच केली आहे. Volvo ची नवीन इलेक्ट्रिक SUV ही भारतातील पहिली स्थानिकरित्या असेंबल केलेली लक्झरी इलेक्ट्रिक वाहन आहे.Volvo XC40 रिचार्ज SUV साठी प्री-बुकिंग आजपासून म्हणजेच 28 जुलैपासून 50,000 रुपयांच्या रिटर्न्सच्या रक्कमसह सुरू होईल.

इच्छुक असलेले खरेदीदार व्होल्वो कार इंडिया वेबसाइटवर थेट ऑर्डर देऊ शकतात आणि ऑनलाइन पेमेंट करू शकतात. SUV च्या किमतींमध्ये 3 वर्षांची सर्व समावेशक कार वॉरंटी, 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी,4 वर्षांची डिजिटल सेवांचे सबस्क्रिप्शन आणि 1 वॉल बॉक्स चार्जर (11kW) थर्ड-पार्टीद्वारे देण्यात आला आहे.

Volvo XC40 Recharge चे फीचर्स आणि रेंज:-

व्होल्वो XC40 रिचार्ज (Volvo XC40 Recharge) प्योर इलेक्ट्रिक SUV ट्विन मोटर,परमानेंट ऑल-व्हील ड्राइव सेटअप आहे आणि 408 एचपी आणि 660 Nm टॉर्क निर्माण करते. कार 4.9 सेकंदात 0 – 100 km/hrs वेग घेऊ शकते आणि तिचा वेग 180 km/hrs आहे. एका चार्जवर या मॉडेलची रेंज 400 kmपेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘

भारतात Volvo XC40 रिचार्जची डिलिव्हरी ऑक्टोबरपासून सुरू होईल. जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी या वर्षाच्या अखेरीस EV चे 150 units वितरीत करण्याची योजना आखत आहे. भारतात Volvo XC40 रिचार्जचे ऑनलाइन बुकिंग ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू राहील, तरीपण, या मॉडेल्सची डिलिव्हरी यावर्षी होणार नाही.

लॉन्च झाल्यानंतर 2 तासांत 500 युनिट्स विकल्या गेल्या :- 

Volvo XC40 रिचार्जला भारतातील खरेदीदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने घोषणा केली आहे की तिची सर्व-इलेक्ट्रिक SUV 2022 पर्यंत बुकींग उघडण्याच्या अवघ्या 2 तासांत विकली गेली आहे.

पहिल्या बॅचची विक्री झाली असली तरी व्होल्वो (Volvo) पुढील वितरणासाठी ऑर्डर स्वीकारत आहे. मात्र, पुढील बॅच भारतात कधी येणार याबाबत कोणतीही माहिती अजून आलेली नाही. XC40 रिचार्ज स्थानिकरित्या असेंबल केले जाते आणि पूर्ण लोड केलेल्या P8 AWD ट्रिममध्ये दिले जाते, ज्याची किंमत रु 55.90 लाख (Ex-showroom) आहे.