Take a fresh look at your lifestyle.

Heroची जबरदस्त ऑफर, आधार कार्ड दाखवा अन् मनपसंद बाईक घरी घेऊन जा !

शेतीशिवार टीम,17 डिसेंबर 2021:- मोटरसायकल आणि स्कूटरची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू केल्या आहेत. कंपनीने आज एक विशेष रिटेल फायनान्स कार्निव्हल सुरू केला आहे. या अंतर्गत ग्राहकांना कंपनीचे वाहन कोणत्याही डाऊन पेमेंटशिवाय आणि व्याज न घेता खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे. एवढंच नाही तर ग्राहकांना आधार कार्डद्वारेच कर्ज ही उपलब्ध होणार आहे.

झिरो डाउन पेमेंट (Zero down payment), झिरो व्याजदर (zero interest rates) :-

खरं तर, वर्षाच्या अखेरीस, कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिटेल फायनान्स कार्निव्हल सुरू केले आहे. हे आजपासून सुरू झालं आहे आणि 31 डिसेंबर 2021 पर्यंत चालणार आहे.

कार्निव्हलमुळे देशातील विविध विभागातील ग्राहकांना फायनान्सवर सहज वाहने खरेदी करता येतील. याअंतर्गत ग्राहकांना झिरो डाउन पेमेंट, झिरो व्याजदर आणि डाउन पेमेंट, झिरो रेट ऑफ इंटरेस्‍ट आणि झिरो प्रोसेसिंग फी अशा सुविधा मिळणार आहेत.

आधार कार्डावर Aadhaar card मिळेल कर्ज :-

Hero MotoCorp ने एक आधार आधारित एक ‘लोन एप्‍लीकेशन स्‍कीम’ देखील सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना वाहन वित्तपुरवठा करण्यासाठी त्यांचे आधार कार्ड दाखवणे आवश्यक आहे.

मुख्य ऑफर व्यतिरिक्त, ते कार्निव्हल ग्राहकांना किसान हप्ता, नो हायपोथेकेशन आणि सुविधा (बँकेच्या चेकशिवाय) सारखी विशेष आर्थिक उत्पादने देखील ऑफर करत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी, ग्राहक Hero MotoCorp च्या अधिकृत डीलरशिप आणि ऑनलाइन चॅनेलला भेट देऊ शकतात.