Take a fresh look at your lifestyle.

‘या’ स्वस्तात मस्त SUV ला जबरदस्त डिमांड, ‘या’ शोरुमकडून एकाच दिवशी 75 युनिट्सची डिलिव्हरी ; Venue, Punch पेक्षा खूपच स्वस्त…

शेतीशिवार टीम : 19 ऑगस्ट 2022 :- Citroen India ने देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या सर्व- न्यू Citroen C3 SUV ची विक्रमी डिलिव्हरी केली. कंपनीने या लक्झरी कारच्या 75 युनिट्स दिल्लीतील आपल्या पार्टनर पॅरिस मोटोकॉर्पकडून डिलिव्हरी केल्या. दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये कार बुक करणाऱ्या सर्व ग्राहकांना कारच्या चाव्या देण्यात आल्या. कंपनीने या वर्षी जुलैमध्ये Citroen C3 मॉडेल लाँच केले होते. त्याची एक्स-शोरूम किंमत 5.70 लाख रुपये आहे. सिट्रोएनचे देशातील 18 शहरांमध्ये शोरूम आहेत. भारतीय बाजारपेठेत Citroen C3 ची स्पर्धा Maruti Swift (रु. 5.92 लाख), Tata Punch (रु. 5.93 लाख), Hyundai Venue (रु. 7.54 लाख) यांच्याशी आहे.

Citroen C3 SUV च्या व्हेरिएंटच्या किमती, पहा…

Citroen C3 1.2 पेट्रोल Live व्हेरियंटची एक्स – शोरूम किंमत 5.70 लाख रुपये आहे, 1.2 पेट्रोल Feel व्हेरिएंटची किंमत 6.62 लाख रुपये आहे, 1.2 पेट्रोल Feel Vibe Pack व्हेरिएंटची किंमत 6.77 लाख रुपये आहे, 1.2 पेट्रोल Feel Dual Tone ची किंमत 6.77 लाख रुपये आहे. Dual Tone Vibe Pack ची किंमत 6.92 लाख रुपये आणि 1.2 Turbo Feel Dual Tone Vibe Pack ची किंमत 8.05 लाख रुपये आहे.

SUV ला मिळतात 2 इंजिन ऑप्शन :-

Citroen C3 दोन इंजिन ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. हे हाय-स्पेक 1.2-लीटर टर्बो – पेट्रोल इंजिन आणि लो – स्पेक – ॲस्पिरेटेड 1.2-लीटर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हाय स्पेक इंजिन मॉडेल 110hp पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करते. लो-स्पेक मॉडेल 82hp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते. यात फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. हे 5-स्पीड आणि 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेलं आहे.

Citroen C3 SUV चे फीचर्स :-

Citron C3 ब्लॅक कलर सीट फॅब्रिक फ्रेंच ऑटोमेकरच्या फोर मोनोटोन कलर्स, 6 ड्युअल-टोन कलर्ससह येते. डॅशबोर्डमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसाठी समर्थन असलेली 10-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मॅन्युअल एअर कंडिशनिंग, फोर-स्पीकर साउंड सिस्टम, फ्रंट आणि रिअर यूएसबी चार्जिंग पोर्ट समाविष्ट आहेत. सेफ्टीसाठी, यात ड्युअल एअरबॅग्ज, बॅक पार्किंग सेन्सरसह सीटबेल्ट रिमाइंडरही मिळतात.

Citroen C3 SUV चे डायमेंशन :-

या SUV च्या डायमेंशनबद्दल बोलायचं झालं तर, त्याची लांबी 3,981mm, रुंदी 1,733 mm आणि उंची 1,586 mm आहे. यात ड्युअल-टोन अलॉय व्हील, चार मोनो-टोन आणि हेक्सागोनल एअर डॅमसह दोन ड्युअल-टोन शेड्स, एक्स-आकाराची फॉक्स स्कफ प्लेट आणि ऑल-राउंड ब्लॅक क्लॅडिंग मिळते. त्याच्या चाकांमध्ये 15-इंच स्टील व्हील्स जोडण्यात आली आहेत. एक ऑप्शन म्हणून, तुम्हाला 15-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील मिळतात. कारच्या बॅक साईडला रॅपराउंड टेल-लाइट्स लावण्यात आले आहेत.

देशभरातील 18 शहरांमध्ये Citroen शोरूम :-

सिट्रोएनचे देशातील 18 शहरांमध्ये शोरूम आहेत. चेन्नई (तामिळनाडू), बेंगळुरू (कर्नाटक), कोईम्बतूर (तमिळनाडू), हैदराबाद (तेलंगणा), कालिकत (केरळ), कोची (केरळ), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), पुणे (महाराष्ट्र), मुंबई (महाराष्ट्र) येथे त्याचे 2 डीलर आहेत. सुरत (गुजरात), कोलकाता (पश्चिम बंगाल), अहमदाबाद (गुजरात), लखनौ (उत्तर प्रदेश), जयपूर (राजस्थान), गुरुग्राम (हरियाणा), नवी दिल्ली आणि चंदीगड.