Take a fresh look at your lifestyle.

ऑफर असावी तर अशी… ! बोलेरो, स्कॉर्पियो ते XUV300 पर्यंत, महिंद्रा कंपनी देत आहे 81500 पर्यंतचा मोठा डिस्काउंट…

शेती शिवार टीम, 9 मे 2022 :- महिंद्रा अँड महिंद्राने मे 2022 साठी त्यांच्या SUV वर डिस्काउंट आणि ऑफर जाहीर केल्या आहेत. कंपनीने कॉर्पोरेट, कॅश आणि एक्सचेंज बोनस अंतर्गत ही सूट जाहीर केली आहे. ही सूट कंपनीच्या 6 मॉडेल्सवर उपलब्ध असून यामध्ये KUV100 NXT, बोलेरो, स्कॉर्पिओ, XUV300, Marazzo आणि Alturas G4 यांचा समावेश आहे. एकूणच, महिंद्राच्या वाहनावर 81,500 रुपयांपर्यंत सूट देत आहे. म्हणजेच तुम्ही इतके पैसे वाचवाल की, 71,432 रुपये किमतीची Honda Activa खरेदी कराल,यानंतरही तुमची 10 हजारांहून अधिक रुपयांची बचत होणार होईल, कंपनीच्या कोणत्या मॉडेलवर किती सूट मिळेल ते आपण जाणून घेउया..

बोलेरो (Bolero) :-

महिंद्राच्या बोलेरोवर (Bolero) या महिन्यात 19,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. कंपनी या SUV वर रु. 10,000 पर्यंत एक्सचेंज बोनस, रु. 3,000 पर्यंत कॉर्पोरेट सूट आणि रु. 6,000 पर्यंत अतिरिक्त ऑफर देत आहे. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 8.42 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 9.41 लाख रुपये आहे.

स्कॉर्पियो (Scorpio) :-

महिंद्राच्या स्कॉर्पिओवर (Scorpio) या महिन्यात 27,320 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. कंपनी या SUV वर रु. 10,000 पर्यंत एक्सचेंज बोनस, रु 4,000 पर्यंत कॉर्पोरेट सूट आणि रु. 13,320 पर्यंत अतिरिक्त ऑफर देत आहे. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 12.26 लाख रुपये आहे तर टॉप व्हेरिएंटची किंमत 19.87 लाख रुपये आहे.

3. KUV100 NXT

महिंद्राच्या KUV100 NXT वर या महिन्यात Rs 37,190 पर्यंत सूट मिळत आहे. कंपनी या SUV वर Rs 14,190 पर्यंत कॅश डिस्काउंट, Rs 20,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि Rs 3,000 पर्यंत कॉर्पोरेट सूट देत आहे. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 6.04 लाख रुपये आहे. तसेच टॉप व्हेरिएंटची किंमत 7.48 लाख रुपये आहे.

4. XUV300 :-

महिंद्राच्या XUV300 वर या महिन्यात Rs 46,581 पर्यंत सूट मिळत आहे. कंपनी या SUV वर Rs 7,581 पर्यंत कॅश डिस्काउंट, Rs 25,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि Rs 4,000 पर्यंत कॉर्पोरेट सूट देत आहे. तसेच, 10,000 रुपयांची अतिरिक्त ऑफर देखील उपलब्ध असणार आहे. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 7.96 लाख रुपये आहे. तर, टॉप व्हेरिएंटची किंमत 13.33 लाख रुपये आहे.

5. मराझो (Marazzo) :-

महिंद्राच्या Marazzo वर या महिन्यात Rs 44,850 पर्यंत सूट मिळत आहे. कंपनी या एसयूव्हीवर (SUV) 24,650 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट,15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 5,200 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 14.16 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 19.99 लाख रुपये आहे.

6. अल्टुरस G4 (Alturas G4) :-

महिंद्राच्या Alturas G4 वर या महिन्यात Rs 81,500 पर्यंत सूट मिळत आहे. कंपनी या SUV वर रु. 50,000 पर्यंत एक्सचेंज बोनस, रु. 11,500 पर्यंत कॉर्पोरेट सूट आणि रु. 20,000 पर्यंत अतिरिक्त ऑफर देत आहे. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 28.77 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 31.77 लाख रुपये आहे.