Take a fresh look at your lifestyle.

न्यू Mahindra Thar इलेक्ट्रिक देणार सर्वांना झटका ! तब्बल 550Km रेंजसह होणार लॉन्च, किंमतही असणार स्वस्त..

महिंद्रा ही भारतातील सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांच्याकडे ऑफ – रोड आणि लक्झरी SUV वाहनांची मोठी यादी आहे. आज महिंद्राकडे सर्व सेगमेंट आणि बजेटमध्ये SUV आहेत ज्यामध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्ससह जबरदस्त फीचर्स देण्यास आले आहे. महिंद्राच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक म्हणजे थार (Thar), आता त्याच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटसह एक न्यू 5 – डोअर व्हेरियंट लॉन्च होणार आहे. महिंद्र हे वाहन त्याच्या सर्व – नवीन आणि ऍडव्हान्स INGLO P1 प्लॅटफॉर्मवर तयार करणार असून हाय परफॉर्मन्स व जास्त रेंज देण्यास सक्षम ठरणार आहे.

ॲट्रॅक्टीव्ह डिझाइनसह होणार लॉन्च..

महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक थार खूपच शानदार असणार आहे, आणि कंपनीने ऑफ – रोडरसह त्याचे डिझाइनही लक्झरी ठेवले आहे. या वाहनात, कंपनीने अगदी न्यू ग्रील, तीन व्हर्टिकल LED लाईट्स, स्क्वेअर व्हील क्लॅडिंग, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, 5-डोअर फिगर, सी-पिलरवरील बॅक साईडला हँडल आणि अर्थातच ऑफ – रोडिंग लाइट्स दिले आहेत. जे या वाहनाचा लूक वाढवतात. ते अतिशय नेत्रदीपक बनवते. हे ब्रँडचे सर्वात आक्रमक दिसणारे वाहन असेल जे तुम्हाला एक आश्चर्यकारक अनुभव देऊ शकते.

आत्तापर्यंत महिंद्राने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक थारचे संपूर्ण डिटेल्स तर दिले नाहीत. न्यू इलेक्ट्रिक Thar.ev मध्ये तुम्हाला 60kW चा बॅटरी पॅक मिळेल अशी अपेक्षा आहे, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 400 ते 550 किलोमीटरची लांबलचक रेंज देईल. तसेच, या वाहनात तुम्हाला ड्युअल मोटर सेटअप पाहायला मिळणार आहे.

ही फोर – व्हील ड्राईव्ह एसयूव्ही असणार आहे, जी कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर आरामात गाडी चालवू शकते. कंपनी हे वाहन त्याच्या सर्वात ॲडव्हान्स INGLO P1 प्लॅटफॉर्मवर डिझाइन करेल, त्यानंतर या वाहनाला आणखी फीचर्स मिळतील. यामध्ये तुम्हाला मोठ्या टायर्ससह एक लांब व्हील बेस देखील मिळेल ज्यामुळे तुमची ॲडव्हेंचर ट्रिप आरामदायी होईल..

आकर्षक आणि प्रीमियम फीचर्स..

न्यू Mahindra Thar.e मध्ये, कंपनीने अधिकाधिक आधुनिक टेक्नॉलॉजीचे फीचर्स दिले आहेत ज्यामुळे या वाहनाला उत्कृष्ट लुक मिळेल आणि ती एकदम लक्झरी बनेल.

ही एक प्रीमियम फुल साइज ऑफ – रोड SUV असेल ज्यामध्ये चांगल्या परफॉर्मन्ससह चांगले फीचर्स असतील. या इलेक्ट्रिक थारमध्ये तुम्हाला 12 इंच डिजिटल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, हरमन म्युझिक प्लेयर, सनरूफ, 6 एअर बॅग, अलॉय व्हील, कीलेस एंट्री, ड्युअल-झोन एसी, फोर बाय फोर डिस्क ब्रेक, एलईडी लाइटिंगसह सर्व प्रीमियम फीचर्स मिळतील..

महिंद्राने अद्याप आपल्या नवीन इलेक्ट्रिक थारच्या लॉन्चबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की, ही इलेक्ट्रिक ऑफ – रोड SUV मार्च 2025 पर्यंत भारतीय बाजारपेठेत येईल. या वाहनाची सुरुवातीची किंमत ₹18 लाख असेल जी ₹26 लाखांच्या एक्स – शोरूम किंमतीपर्यंत जाईल. हे एक प्रीमियम आणि आलिशान वाहन असेल जे तुम्हाला एक आश्चर्यकारक अनुभव देईल.