Take a fresh look at your lifestyle.

‘या’ Electric Scooter ची डिमांड संपता संपेना…,150 Km रेंज, किंमतही स्वस्त, रोज 3 रुपयांत पळवा 290Km पर्यंत, पहा फीचर्स अन् किंमत…

सप्टेंबर 2022 हे तसं सर्व व्हीकल कंपन्यांसाठी उत्तम ठरलं आहे. पण या वर्षी TVS मोटरसाठी ते जास्तच भव्यदिव्य राहिलं आहे. कंपनीची या वर्षी 9.18% वाढ झाली तर गेल्या महिन्याला 13.55% वाढ झाली आहे. कंपनीने 2 – व्हीलर आणि 3 – व्हीलर व्हीकल या दोन्ही सेगमेंटमध्ये वाढ कमालीची वाढ केली आहे. परंतु, टू – व्हीलर सेगमेंटमध्ये मोटारसायकल आणि स्कूटरच्या तुलनेत, इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube ची वार्षिक वाढ 542% झाली आहे.

परंतु, स्कूटर विभागात कंपनीने 38.68% वाढीसह 144,356 युनिट्सची विक्री केली आहे. यावरून ज्युपिटर (Jupiter) कंपनीच्या मागणीत कमालीची झेप घेतली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, ज्युपिटरच्या 70,075 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

iCube Ev वरून दिवसभर फिरा फक्त 3 रुपयांत…

TVS Motors ने iQube च्या अधिकृत पेजवर आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) किंमत दिली आहे. पेट्रोल वाहनासाठी लिटरमागे 100 रुपये खर्च करावा लागतो, असं कंपनीचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल स्कूटरवर 50,000 Km चालण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो. तर iQube इलेक्ट्रिक स्कूटरवरून 50,000 Km प्रवास करण्यासाठी फक्त 6,466 रुपयांचा खर्च पुरेसा आहे. तसेच, GST ही वाचतो. सर्व्हिस आणि मेंटेनन्सचा खर्चही वाचतो. अशाप्रकारे iQube 50,000 किमीवर 93,500 रुपयांची बचत करते.

TVS ने iQube च्या सिंगल चार्जची किंमत 18.75 रुपये असल्याचा दावाही केला आहे. त्याचे iQube ST मॉडेल 4 तास आणि 6 मिनिटांत पूर्ण चार्ज होते. यानंतर 145km पर्यंत चालवता येतं. म्हणजेच, जर तुम्ही दररोज 30 Km चालत असाल तर ही इलेक्ट्रिक स्कूटर आठवड्यातून दोनदा चार्ज करावी लागेल. दोनदा चार्जिंगचा खर्च फक्त 37.50 रुपये असेल. म्हणजेच महिन्याचा सरासरी खर्च पकडला तर तो 150 रुपये पडतो. म्हणजेच प्रत्येक दिवसाला फक्त 3 रु. खर्च अन् जर तुम्ही दोनदा चार्ज केल्यावर ही तब्बल 290Km धावेल. म्हणजेच, या खर्चावर तुम्ही दररोज सरासरी 30Km आरामात चालू शकता…

TVS iQube चे जबरदस्त फीचर्स, पहा…

TVS iCube इलेक्ट्रिक स्कूटरला 7 इंच TFT टचस्क्रीन, क्लीन UI, इन्फिनिटी थीम पर्सनलायझेशन, व्हॉईस असिस्ट, अलेक्सा स्किलसेट, इंट्यूटिव्ह म्युझिक प्लेयर कंट्रोल, OTA अपडेट, प्लग-अँड-प्ले कॅरी विथ चार्जर, फास्ट चार्जिंग, सेफ्टी इन्फॉर्मेशन, ब्लूटूथ आणि क्लाउड ऑप्शन 32 L स्टोरेज स्पेस या फीचर्स सह येते.

TVS iQube ST :-

टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरियंट, TVS iQube ST 5.1 kWh बॅटरी पॅकसह येते आणि टॉप व्हेरियंटची रेंज 140 Km आहे. TVS iCube ST मध्ये 7-इंच TFT टच स्क्रीन 5 – वे जॉयस्टिक इंटरॅक्टिव्हिटी, म्युझिक कंट्रोल्स, व्हीकल हेल्थसह प्रोअँक्टिव्ह नोटिफिकेशन, 4G टेलिमॅटिक्स आणि OTA अपडेट्स, स्कूटर थीम पर्सनलायझेशन, व्हॉईस असिस्ट आणि अलेक्सा स्किलसेटसह येते. TVS iQube ST 4 न्यू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे आणि 1.5kW फास्ट-चार्जिंग आणि 32 लीटर अंडर-सीट स्टोरेजसह येते.

TVS iQube S :-

TVS iQube S व्हेरियंट 3.4 kWh बॅटरीसह येते. फुल चार्ज केल्यावर या व्हेरियंटची रेंज 100 Km आहे. TVS iCube S 7-इंच टीएफटी,इंटरेक्शन, म्युझिक कंट्रोल, थीम पर्सनलायझेशन , प्रोअँक्टिव्ह नोटिफिकेशन्ससह व्हीकल हेल्थसारख्या फीचर्ससह येते. TVS iQube S 4 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

TVS iQube :-

TVS iQube च्या बेस व्हर्जनमध्ये 3.4 kWh ची बॅटरी आहे. पूर्ण चार्ज केल्यावर याची रेंज 100 Km आहे. यात 5-इंचाचा TFT टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन असिस्ट आहे. TVS iQube चे बेस व्हेरिएंट देखील तीन कलर ऑप्शनसह येते. यामध्ये दिलेले TVS SMARTXONNECT प्लॅटफॉर्म फीचर्स जसे की, जबरदस्त नेव्हिगेशन सिस्टीम, टेलिमॅटिक्स युनिट, अँटी थेफ्ट आणि जिओफेन्सिंग देते.

किंमत पाहण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी :- https://www.tvsmotor.com/electric-scooter/price-in-pune.html