Take a fresh look at your lifestyle.

या टू -व्हीलरची डिमांड संपता संपेना…Shine, Pulsar, Activa ही फेल, रोज होतेय तब्बल 8077 युनिट्सची विक्री…

शेतीशिवार टीम : 20 ऑगस्ट 2022 :- जर तुम्ही नवीन दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात खूपच प्रकारच्या टू – व्हीलर उपलब्ध आहे. यात दमदार बाइक्सपासून ते उत्तम स्कूटरपर्यंत सर्व गाड्यांचा समावेश आहे. तुमच्या बजेट किती आहे ? त्यानुसार तुम्ही बाईक निवडू शकता. अशा स्थितीत कोणत्या बाईक व स्कूटरला जास्त मागणी आहे, हे समजलं तर मग निवड करणे सोपे होते.

बाईक मध्ये Hero Splendor तर स्कुटरमध्ये Honda Activa या दोन गाड्यांनी जुलै 2022 च्या टॉप-10 दुचाकींमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व राखले आहे. या दोघांच्या मागणीसमोर बजाज, टीव्हीएस, सुझुकी यासह हिरो आणि होंडाच्या इतर मॉडेल्सची वाहनेही अपयशी ठरली. आज आपण जुलै 2022 मध्ये टॉप-10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या टू व्हीलर बद्दल जाणून घेऊयात…

1. हिरो स्प्लेंडर ठरली टॉप सेलिंग बाईक :-

हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) ही जुलैमध्ये सर्वाधिक विक्री होणारी बाइक ठरली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 2,50,409 युनिट्सची विक्री केली. परंतु, जुलै 2021 च्या तुलनेत त्याची विक्री -0.15% कमी झाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये 2,50,794 हिरो स्प्लेंडर्सची विक्री झाली होती. म्हणजेच गेल्या महिन्यात दररोज 8,077 युनिट्सची विक्री झाली.

2. Honda Activa ठरली बेस्ट स्कूटर :-

जुलैमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकींच्या यादीत होंडा अ‍ॅक्टिव्हा ही सर्वोत्तम स्कूटर ठरली. यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ॲक्टिव्हाने गेल्या महिन्यात 2,13,807 युनिट्सची विक्री केली. त्यात वार्षिक आधारावर 31.21% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये कंपनीने 1,62,956 मोटारींची विक्री केली होती.

3. होंडा सीबी शाइनने नंबर 3 पटकवला :-

Honda CB Shine ने जुलै 2022 मध्ये 1,14,663 युनिट्सची विक्री केली. परंतु, वार्षिक आधारावर बाईकची 1.26% ची घसरण झाली. जुलै 2021 मध्ये 1,16,128 युनिट्सची विक्री झाली होती.

4. 4 थ्या नंबरवर बजाज पल्सर राहिली :-

टॉप – 5 टू व्हीलरच्या लिस्टमध्ये बजाज पल्सर (Bajaj Pulsar) चौथ्या क्रमांकावर राहिली. गेल्या महिन्यात या बाईकच्या 1,01,905 युनिट्सची विक्री झाली होती. पल्सरला वार्षिक आधारावर 56.55% ची आश्चर्यकारक वाढ मिळाली आहे. जुलै 2021 मध्ये त्याची 65,094 युनिट्सची विक्री झाली.

5. टॉप 5 मध्ये हिरो एचएफ डिलक्स :-

टॉप -5 लिस्टमध्ये हिरोची एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe) पाचव्या क्रमांकावर होती. जुलै 2021 मध्ये 97,451 युनिट्सची विक्री झाली. परंतु, वार्षिक आधारावर बाइकची 8.33% ची घसरण झाली. जुलै 2021 मध्ये त्याची 1,06,304 युनिट्सची विक्री झाली.

6. TVS ज्युपिटर क्रमांक 6 वर गेली :-

TVS ची सर्वात लोकप्रिय स्कूटर ज्युपिटर टॉप-10 च्या यादीत 6 व्या क्रमांकावर राहिली. कंपनीने या स्कूटरच्या 62,094 युनिट्सची वार्षिक 62.51% वाढीसह विक्री केली. जुलै 2021 मध्ये या स्कूटरच्या फक्त 38,209 युनिट्सची विक्री झाली.

7. बजाज प्लॅटिना क्रमांक 7 वर.. :-

बजाजची सर्वाधिक मायलेज असलेली बाईक प्लॅटिना देखील टॉप-10 यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. यादीत सातव्या क्रमांकावर असलेल्या या बाईकची गेल्या महिन्यात 48,484 युनिट्सची विक्री झाली. परंतु, जुलै 2021 च्या तुलनेत त्यात 11.21% ची घसरण झाली आहे. एका वर्षापूर्वी त्याची 54,606 युनिट्सची विक्री झाली होती.

8. सुझुकी ॲक्सेस 8 व्या क्रमांकावर :-

सुझुकीची ॲक्सेस (Suzuki Access) स्कूटरही टॉप-10 यादीत 8 व्या स्थानावर आहे. जुलै 2022 मध्ये या स्कूटरच्या 41,440 युनिट्सची विक्री झाली. परंतु, वार्षिक आधारावर 11.80% च्या घसरणीचा सामना करावा लागला. जुलै 2021 मध्ये त्याची 46,985 युनिट्सची विक्री झाली होती.

9. Honda Dio ला मिळाला चांगला प्रतिसाद :-

जुलैमध्ये टॉप -10 दुचाकींच्या मागणीत होंडा डिओने सर्वाधिक वाढ नोंदवली. गेल्या महिन्यात, कंपनीने 75.83% च्या वार्षिक वाढीसह 36,229 युनिट्सची विक्री केली. एका वर्षापूर्वी जुलै 2021 मध्ये या स्कूटरच्या 20,604 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

10. TVS XL100 चा टॉप 10 मध्ये शेवट… 

टीव्हीएस XL, जे मोपेड विभागात वर्चस्व कायम ठेवत आहे, ते टॉप-10 यादीत शेवटचे स्थान मिळवले आहे. गेल्या महिन्यात 32,117 मोटारींची विक्री झाली. परंतु, या मोपेडची वार्षिक 34.83% वाढ झाली. जुलै 2021 मध्ये त्याची 49,279 युनिट्सची विक्री झाली होती.