Take a fresh look at your lifestyle.

Tata Motors लॉन्च करणार सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक SUV ! 300Km मिळणार रेंज, किंमतही 10 लाखांच्या आत, पहा डिटेल्स…

शेतीशिवार टीम : 2 सप्टेंबर 2022 : सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर वेगाने काम करणारी कंपनी म्हणजे टाटा मोटर्स (Tata Motors) अन् आत्तापर्यंत सर्वात जास्त EV कार टाटानेचं लॉन्च केल्या आहेत. आता कंपनी इतर ब्रँडच्या तुलनेत खूप महाग EV लाँच न करून बजेट सेगमेंटमध्ये मॉडेल आणणार आहे जेणेकरून अधिकाधिक लोक त्यांचा फायदा घेऊ शकतील.

सध्या, टाटा कडे टिगोर इलेक्ट्रिक (Tigor EV) आणि नेक्सॉन इलेक्ट्रिक (Nexon EV) सारखे मॉडेल्स परवडणाऱ्या किमतीत आहेत आणि ते विक्रीच्या बाबतीतही चांगली कामगिरी करत आहेत. सध्या त्यांचा विक्री दरही दरमहा खूप चांगला आहे.

ग्राहकांची गरज समजून आता कंपनी कमी बजेटमध्ये आणखी एक स्वस्त ईव्ही (EV) आणत आहे. स्रोत आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स (Tata Motors) त्याच्या नवीन इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV वर काम करत आहे. आगामी ईव्ही टाटा पंच ईव्ही (Tata Punch EV) असणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या नवीन ईव्ही (EV) मॉडेलची टेस्ट केली जात आहे. आता असे झाल्यास ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही बनणार आहे.

पूर्ण चार्ज केल्यानंतर 300Km मिळेल रेंज :-

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन Tata Punch EV मध्ये नेक्सॉन EV आणि Tigor EV सारखे Ziptron टेक्नॉलॉजी देखील दिसणार आहे. नवीन पंच EV मध्ये 55Kw इलेक्ट्रिक मोटर आणि 26kW लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळू शकतो.

हे इंजिन 74bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करू शकते. असा विश्वास आहे की, नवीन टाटा पंच EV पूर्ण चार्ज केल्यावर 300Km पर्यंतची रेंज देऊ शकते. याशिवाय यामध्ये फास्ट चार्जिंगचा ऑप्शनही दिला जाणार आहे.

स्वस्त किमतीत होणार लॉन्च :-

नवीन टाटा पंच EV ची (Tata Punch EV) अपेक्षित किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. तसे, पंच ईव्ही बाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या टाटाच्या नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्हीला ईव्ही मार्केटमध्ये चांगलीच पसंती मिळत आहे. नवीन पंच ईव्ही नवीन वर्षात जानेवारीला लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.