Take a fresh look at your lifestyle.

अर्रर्रर्र खतरनाक ! ‘या’ फ्लॅगशिप SUV ने एकाचं मिनिटात मिळवल्या 25 हजार बुकिंग ; 30 मिनिटांत तर, ‘हा’ आकडा एकदा पहाच…

शेतीशिवार टीम : 30 जुलै 2022 :- तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण हे खरंय की, महिंद्राच्या फ्लॅगशिप SUV Scorpio-N ने बुकींगचा नवा रेकॉर्ड बनवला आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुकिंगच्या पहिल्याच मिनिटात या SUV ने 25,000 युनिट्सचे बुकिंग झाले होते. त्याच वेळी, 30 मिनिटांत 1,00,000 हून अधिक युनिट्स बुक करण्यात आल्या.

कंपनीने सकाळी 11 वाजल्यापासून बुकिंग सुरू केले. एकूणच, कंपनीला 18,000 कोटी रुपयांचे बुकिंग मिळालं आहे. याला महिंद्र XUV700 आणि Thar पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहे.

कंपनी 26 सप्टेंबर 2022 पासून नवीन Mahindra Scorpio-N ची डिलिव्हरी सुरू करणार आहे. कंपनी सुरुवातीला त्यातील 20,000 युनिट्स विकणार आहे. कंपनी Z8L व्हेरियंटला अधिक प्राधान्य देणार आहे. ऑगस्ट 2022 च्या अखेरीस ग्राहकांना त्यांच्या डिलिव्हरीबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

Mahindra Scorpio-N चे 22 व्हेरियंट येत आहेत. ज्याची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 23.9 लाख रुपये आहे. यात 175 PS पॉवरसह 2.2-लिटर डिझेल इंजिन आणि 200 PS पॉवरसह 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. SUV ला 4XPLOR टेरेन मॅनेजमेंट 4WD सिस्टम देखील मिळते. नवीन स्कॉर्पिओ एन Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L या 5 ट्रिममध्ये ऑफर केली आहे.

Mahindra Scorpio-N : किंमत :-

Scorpio-N च्या बेस व्हेरियंटची किंमत 11.99 लाख रुपये (Ex-showroom) आहे, जी कारच्या टॉप व्हेरियंटसाठी 21.45 लाख रुपये (Ex-showroom) पर्यंत जाते.

महिंद्रा स्कॉर्पिओ – N ची पुण्यात (Ex-showroom) किंमत 14.46 ते 29.17 इतकी आहे. तर मुंबईमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ – N ची किंमत 14.46 ते 29.17 इतकी आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ – N : डिझाइन :-

ही SUV पूर्णपणे नवीन डिझाइनमध्ये लॉन्च होणार आहे. समोर, तुम्हाला बोल्ड फ्रंट एन्ड, फ्रंट ग्रिलवर नवीन बॅज, क्रोम व्हिन्डोज यासारखे अनेक नवीन डिझाइन देण्यात आले आहेत. ही कार त्याच्या आधीच्या मॉडेल्सपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. याशिवाय, यात डायनॅमिक टर्न इंडिकेटरसह ऑटोमेकरचे ड्युअल-बॅरल सेटअप प्रोजेक्टर हेडलॅम्प्स पुन्हा डिझाइन केलेले आहेत. याशिवाय, यात C-आकाराचे LED DRL मिळतात जे फॉग लॅम्प आहेत. याशिवाय, याला बोनेटवर पॉवर लाईन्स देखील मिळतात, ज्यामुळे SUV च्या पर्सनालिटीत भर पडते.

महिंद्रा स्कॉर्पिओ- N : व्हेरियंट :-

Mahindra Scorpio-N भारतीय बाजारपेठेत Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8 L या पाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. वरील सर्व प्रकारांमध्ये डिझेल इंजिन असेल. त्याचप्रमाणे, Z6 व्हेरियंट वगळता सर्व प्रकार पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असतील.

महिंद्रा स्कॉर्पिओ- N : फीचर्स :-

नवीन Scorpio-N मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay आणि अपग्रेड स्पष्ट करण्यासाठी कनेक्ट केलेली फीचर्स यासारखी अनेक फीचर्स आहेत.

महिंद्रा स्कॉर्पिओ- N : इंजिन

Mahindra Scorpio-N मध्ये दोन भिन्न पॉवरट्रेन ऑप्शन आहेत : एक 2.0L mStallion टर्बो-पेट्रोल आणि 2.2L mHawk डिझेल. नंतरचे 175 PS चे पीक पॉवर आउटपुट तयार करते. 6-स्पीड MT आणि 6-स्पीड AT दोन्ही ट्रान्समिशन म्हणून उपलब्ध आहेत.