Take a fresh look at your lifestyle.

भारतातील टॉप – 5 CNG Cars, 75 रुपयांत मिळणार 35Km पर्यंत मायलेज, किंमत 8 लाखांच्या आत, पहा फीचर्स…

शेतीशिवार टीम : 3 जुलै 2022 : Best CNG Cars : आज आपण देशातील टॉप 5 सीएनजी (Top-5 CNG) कारबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या Cars चा इंधन खर्च खूपच कमी आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा सीएनजीवर (CNG) चालणाऱ्या गाड्या जास्त मायलेज देतात आणि सीएनजीच्या (CNG) किमतीही पेट्रोल आणि डिझेलपेक्षा कमी असतात. अशा काही Cars आहेत ज्या 75 रुपयांमध्ये 35Km पर्यंतची रेंज देतात.

1.मारुती सुझुकी – Celerio CNG :-

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने अलीकडेच सर्व – नवीन सेलेरियोचे CNG व्हेरियंट लॉन्च करण्याची घोषणा केली. S-CNG टेक्नोलॉजी असलेली मारुती सुझुकी सेलेरियो फक्त VXi व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत रु. 6.58 लाख (Ex-showroom) आहे. नवीन CNG व्हेरियंट हा ब्रँडच्या भारतातील वाढत्या ग्रीन व्हेइकल पोर्टफोलिओचा भाग आहे असून Celerio CNG सध्या भारतातील सगळ्यात जास्त म्हणजे 35.60Km मायलेज देणारी पहिली कार ठरली आहे.

नवीन Celerio ही पेट्रोल व्हेरियंटमध्ये नोव्हेंबर 21 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि लॉन्च झाल्यापासून दोन महिन्यांत जवळपास 25,000 बुकिंग मिळालं आहेत. Celerio 4.99 लाख रुपये (Ex-showroom) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. मारुती सुझुकी सेलेरियो 7 व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे आणि S-CNG हा 8 वा व्हेरियंट आहे.

2. टाटा Tiago iCNG :-

टाटा मोटर्सने आपल्या Tiago हॅचबॅकचे CNG-व्हेरियंट लॉन्च केलं, ज्याला Tiago i-CNG म्हणून ओळखलं जातं, ज्याची किंमत रु. 6.10 लाख (Ex-showroom) पासून सुरू होते. टाटा टियागो आय-सीएनजी व्हेरियंट त्याच 1.2-लिटर, 3 – सिलेंडर, रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिनमधून पॉवर मिळवतं. CNG व्हेरियंट मध्ये,Tata Tiago ला प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रोम इन्सर्टसह ग्रिलसाठी पियानो ब्लॅक ट्राय-एरो डिझाइन, क्रोम गार्निशसह फॉग लाइट्स, LED DRLs, 15-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स मिळतात.

3.टाटा टिगोर iCNG :-

Tata Tigor iCNG ची किंमत XZ ट्रिमसाठी 7.70 लाख रुपये आणि XZ+ ड्युअल-टोनसाठी 8.42 लाख रुपये आहे, ज्यामुळे हा Hyundai Aura CNG पेक्षा चांगला ऑप्शन ठरतो. Tigor iCNG फक्त टॉप-स्पेक XZ आणि XZ+ ट्रिममध्ये खरेदी करता येते. नुकतेच लॉन्च केलेली टिगोर सीएनजी CNG सध्याच्या 1.2-लिटर नॅच्युरली -अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जी 6,000rpm वर 72bhp आणि 3,500rpm वर 95Nm टॉर्क जनरेट करते. CNG व्हेरियंट 5 – स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन युनिटपुरता मर्यादित आहे. सुरक्षेच्या बाबतीत, वाहन ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट यांसारख्या फीचर्ससह येते.

4.मारुती सुझुकी Wagon R CNG :-

Wagon R S-CNG LXI ला सेंट्रल लॉकिंग, फ्रंट पॉवर विंडो, मॅन्युअल एअर कंडिशनिंग, 12V सॉकेट आणि 13-इंच स्टील व्हील मिळतात. वॅगन आर सीएनजी 1.0-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनमधून पॉवर काढते, जे पेट्रोलवर चालत असताना 68hp आणि 90Nm टॉर्क निर्माण करते आणि CNG वर चालत असताना 59hp/78Nm. हे फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. वॅगन आर सीएनजी 33.54km रेंजचा दावा करते. विशेष म्हणजे, मारुती सुझुकीने सध्या मोठ्या 83hp, 1.2-लीटर इंजिनला CNG ने सुसज्ज न करण्याचा ऑप्शन निवडला आहे.

5.Hyundai Aura CNG :-

Hyundai Aura चे SX व्हेरियंट हे CNG इंजिन ऑप्शनने समर्थित नवीन टॉप-एंड ट्रिम आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 8.56 लाख रुपये आहे. Hyundai Aura CNG 1.2-लिटर नॅच्युरली – अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. हे 6,000 rpm वर 68 Bhp ची कमाल पॉवर आणि 4,000 rpm वर CNG वर 95 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात फक्त पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा ऑप्शन मिळतो.