येणारं नवं वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पैशांचा पाऊस पाडणारं ठरणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुधारणा करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. येत्या वर्षभरात वेतन आयोग रद्द करून सरकार नवीन फॉर्म्युला राबवणार आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टर बदलला जाणार आहे.

या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी आहे की त्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करावी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी सरकार त्याचा आढावा घेऊन फिटमेंट फॅक्टर वाढवणार आहे. सध्याचे फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये किती होऊ शकते वाढ..

फिटमेंट फॅक्टर वाढण्याच्या दोन बाजू आहेत. पहिला फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3 पर्यंत वाढवला पाहिजे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुमारे 3000 रुपयांची वाढ होणार आहे. दुसरीकडे, 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवला पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 8 हजार रुपयांचा फरक होणार आहे. वास्तविक, त्याची गणना पे बँडनुसार बदलते.

वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचे सूत्र स्वीकारण्यात आलं. 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, फिटमेंट रेशो 1.86 होता. परंतु, 7 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या सर्व वेतन बँडवर 2.57 चा सामाईक फिटमेंट लाभ लागू करण्यात आला. वेतन आयोगानेच याची शिफारस केली होती.

7 व्या CPC मध्ये फिटमेंट फॅक्टरचे कॅल्क्युलेशन कसे केले जाते ?

असं समजा की, मूळ वेतन 31.12.2022 पर्यंत (100%) = 1.00
महागाई भत्ता 31.12.2022 पर्यंत (125%) = 1.25
एकूण (मूळ वेतन + DA) = 2.25
7 व्या CPC ने एकूण रकमेवर 14.29% वाढ करण्याची शिफारस केली आहे (मूळ वेतन + DA) = 0.32
फिटमेंट फॅक्टर = 2.57

फिटमेंट फॅक्टरद्वारे मूळ वेतन कसे ठरवले जाते ? 

Pay Band Grade pay Entry pay Level Index 7th CPC Basic salary
₹5200-20200 ₹1800 ₹7000 1 2.57 ₹18000
₹1900 ₹7730 2 2.57 ₹19900
₹2000 ₹8460 3 2.57 ₹21700
₹2400 9910 4 2.57 ₹25500
₹2800 11360 5 2.57 ₹29200

 

फिटमेंट फॅक्टर वाढवल्यानंतर मूळ वेतन किती होणार ?

Pay Band Grade Pay Entry Pay Level Index 7th CPC Basic Salary
₹5200-20200 ₹1800 ₹7000 1 3.68 ₹25,760
₹1900 ₹7730 2 3.68 ₹28,447
₹2000 ₹8460 3 3.68 ₹31,133
₹2400 ₹9910 4 3.68 ₹36,468
₹2800 ₹11360 5 3.68 ₹41,804

पगारात 12604 रुपयांची होणार वाढ..

फिटमेंट फॅक्टर बदलल्यावर सर्व पे – बँडसाठी वेतन सुधारित केलं जाईल. मूळ वेतनातील फरक स्पष्टपणे दिसून येईल. वर दिलेल्या दोन्ही चार्टमध्ये, पगारात कसा आणि किती फरक असेल हे कॅल्क्युलेशन द्वारे दाखवलं आहे.

पहिल्या टेबलमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. तसेच, दुसऱ्या टेबलमध्ये, अपेक्षित वाढीसह 3.68 ठेवला आहे. जर आपण ग्रेड पे 2800 बघितला तर फिटमेंट बदलल्यानंतर एकूण पगारात 12,604 रुपयांचा फरक होणार आहे म्हणजे पगार 41,804 रुपयांपर्यंत पोहचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *