DA Hike : खुशखबर! कर्मचाऱ्यांना मिळाला आत्तापर्यतचा सर्वात मोठा DA, पगारात झाली थेट 38,766 रुपयांची वाढ, पहा श्रेणीनुसार कॅल्क्युलेशन..

0

केंद्रीय कर्मचाऱ्यांवर माँ दुर्गेच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांच्यावर लक्ष्मीचा वर्षाव होणार आहे. 22 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माँ शैलपुत्री ही सुख आणि समृद्धीची देवी मानली जाते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना या दिवशी चांगली बातमी मिळणार आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मार्च महिना संपण्यासाठी शेवटचे 10 दिवस उरले आहेत. अशा स्थितीत सरकार महागाई भत्त्याची घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बुधवारी होणाऱ्या बैठकीत DA वाढीला मंजुरी मिळू शकते.

आतापर्यंतचा काय आहे ट्रॅक रेकॉर्ड ?

तसं पाहिलं तर, आतापर्यंत महागाई भत्ता हा मार्चमध्ये जाहीर करण्याचा सरकारचा रेकॉर्ड आहे. यासोबतच सर्वांना मार्च आणि एप्रिलच्या पगारातचं या महागाई भत्त्याचे पैसे मिळतात. गेल्या तीन वर्षांचा विचार केल्यास, 2019, 2021, 2022 या वर्षातील जानेवारीपासून लागू होणारी DA वाढ मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मंजूर केला जातो. त्यामुळेच यंदाही बुधवारी होणाऱ्या बैठकीत त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, महिन्यातील शेवटचे मंत्रीमंडळ 29 तारखेला आहे. अशा स्थितीत पगार समायोजनासाठी दोनच दिवसांचा अवधी मिळणार आहे. म्हणूनच उद्याचा दिवस बुधवार सर्वात अनुकूल आहे.

पगारात किती होणार वाढ ?

महागाई भत्ता 4% ने वाढला आहे. आतापर्यंत महागाई भत्त्याचा दर 38 टक्के आहे. 4% वाढीनंतर, DA आता 42% पर्यंत वाढणार आहे. पे – बँडनुसार प्रत्येकाच्या पगारात वाढ होईल. पे मॅट्रिक्सनुसार, ग्रेड पे (GP) 1800 च्या लेव्हल-1 वर किमान मूळ वेतन 18000 रुपये आहे. तर, कमाल वेतन श्रेणी रु.56,900 आहे. जर तुम्ही किमान वेतन श्रेणी पाहिली तर डीएमध्ये दरमहा 720 रुपयांची वाढ होणार असून म्हणजे प्रति वर्ष 8640 रुपये. तसेच, कमाल वेतन श्रेणीमध्ये 27,312 रुपयांची वार्षिक वाढ होणार आहे. या ब्रॅकेटमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 2276 रुपयांची वाढ होणार आहे.

लेव्हल – 5 कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार?

ग्रेड पे 2800 च्या लेव्हल – 5 वर किमान मूळ वेतन 29,200 रुपये आहे. या वेतन श्रेणीतील महागाई भत्त्यात 1,168 रुपयांची वाढ होणार आहे. त्यांना 11,096 रुपये महागाई भत्ता मिळत होता, जो 38% दराने उपलब्ध होता. परंतु, वाढ केल्यानंतर, त्याला 42% दराने 12,264 रुपये दिले जाणार आहे.

तर, यामध्ये कमाल मूळ वेतन 92300 रुपये आहे. हा पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही 35,074 रुपये (38%) महागाई भत्ता मिळत आहे. दुसरीकडे, 4% ने वाढल्यानंतर, त्यांचा महागाई भत्ता 42% असल्यास रु.38,766 होणार असून एकूण 3,692 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर, त्याला 44,304 रुपये नफा मिळत आहे.

पेन्शनधारकांनाही मिळणार पे – बँडनुसार लाभ :-

केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच देशातील लाखो पेन्शनधारकांना सरकारकडून अपेक्षा आहेत. अशातच महागाई भत्ता (DA Hike) सोबत, महागाई सवलत (DR Hike) देखील 4% ने वाढणार आहे. म्हणजे पेन्शनधारकांना 42% दराने महागाई सवलत देखील दिली. एकूणच, सणासुदीच्या काळात मोदी सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांना 7 व्या वेतन आयोगांतर्गत मोठा लाभ देणार आहे.

ग्रेड पेनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगाराचा तक्ता पहा..

GP 1800 1900 2000 2400 2800
Level 1 2 3 4 5
1 18000 19900 21700 25500 29200
2 18500 20500 22400 26300 30100
3 19100 21100 23100 27100 31000
4 19700 21700 23800 27900 31900
5 20300 22400 24500 28700 32900
6 20900 23100 25200 29600 33900
7 21500 23800 26000 30500 34900
8 22100 24500 26800 31400 35900
9 22800 25200 27600 32300 37000
10 23500 26000 28400 33300 38100
11 24200 26800 29300 34300 39200
12 24900 27600 30200 35300 40400
13 25600 28400 31100 36400 41600
14 26400 29300 32000 37500 42800
15 27200 30200 33000 38600 44100
16 28000 31100 34000 39800 45400
17 28800 32000 35000 41000 46800
18 29700 33000 36100 42200 48200
19 30600 34000 37200 43500 49600
20 31500 35000 38300 44800 51100
21 32400 36100 39400 46100 52600
22 33400 37200 40600 47500 54200
23 34400 38300 41800 48900 55800
24 35400 39400 43100 50400 57500
25 36500 40600 44400 51900 59200
26 37600 41800 45700 53500 61000
27 38700 43100 47100 55100 62800
28 39900 44400 48500 56800 64700
29 41100 45700 50000 58500 66600
30 42300 47100 51500 60300 68600
31 43600 48500 53000 62100 70700
32 44900 50000 54600 64000 72800
33 46200 51500 56200 65900 75000
34 47600 53000 57900 67900 77300
35 49000 54600 59600 69900 79600
36 50500 56200 61400 72000 82000
37 52000 57900 63200 74200 84500
38 53600 59600 65100 76400 87000
39 55200 61400 67100 78700 89600
40 56900 63200 69100 81100 92300
Leave A Reply

Your email address will not be published.