भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग ; जो आहे 4273Km, 9 पेक्षा जास्त राज्यांतुन जाताना लागतात ‘इतके’ दिवस, पहा…
शेतीशिवार टीम : 7 जुलै 2022 :- भारतीय रेल्वे (Indian Railways) ही लांब पल्ल्याच्या प्रवासाचे एक सोयीस्कर आणि स्वस्तात – मस्त प्रवासी वाहन आहे. दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात, काही लोक थोड्या अंतराचा प्रवास करतात तर काही लांब पल्ला गाठतात. परंतु, जर भारताच्या सर्वात लांब रेल्वे मार्गाविषयी बोलायचं झाल तर तो 4,00,00Km आणि 9 पेक्षा जास्त राज्यांमधून जाणारा रेल्वेमार्ग आहे, जे पार करण्यासाठी तब्बल 83 तासांचा वेळ लागतो.
होय, हे अगदी खरं आहे की, डिब्रुगढ ते कन्याकुमारी दरम्यानचा रेल्वेमार्ग हा भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग आहे आणि जगातील सर्वात लांब मार्गांमध्येही त्याचे विशेष स्थान आहे. हा मार्ग वेगवेगळ्या हवामान, परिसर आणि भाषिक प्रदेशांच दर्शन तर देतोचं तसेच वाटेत वेगवेगळ्या संस्कृतींचा अनुभव देत प्रवास घडवतो…
कोणत्या रेल्वेने या मार्गाच्या प्रवासाचा आनंद घेतला जाऊ शकतो ?
विवेक एक्सप्रेसने भारताच्या सर्वात लांब रेल्वे मार्गावर, जो सुमारे 55 निर्धारित स्टॉपसह 80 तास, 15 मिनिटामध्ये 4273Km प्रवास पूर्ण करतो. हा रेल्वेमार्ग तामिळनाडूमधील भारताची मुख्य भूमी कन्याकुमारीच्या उत्तरेकडील टोकास ईशान्य दिशेपासून तर थेट आसाममधील डिब्रुगरशी जोडला गेला आहे.
यानंतर, परत जातानाही ही ट्रेन त्याच मार्गावर येते. नोव्हेंबर 2011 मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंती स्मरणार्थ विवेक एक्सप्रेस ट्रेनचे उदघाटन झालं तर या ट्रेनची खरी सुरुवात 2013 पासून झाली.
मार्च 2022 मध्ये जेव्हा covid-19 चा प्रतिकार करण्यासाठी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली गेली तेव्हा रेल्वेचे कामकाज स्थगित करणारी ही शेवटची ट्रेन होती. हि ट्रेन उत्तरेकडून दक्षिणेकडे टिन्सुकिया, दिमापूर, गुवाहाटी, बोंगाईगाव, अॅलीपुरद्वार, सिलिगुडी, किशंगंज आणि मालदा मार्गे जाते.
तसेच ही ट्रेन रामपूरहट, पाकुड, दुर्गापूर, आसनसोल, खरागपूर, बालासर, कटक, भुवनेश्वर, खोरधा, ब्रहमपूर, श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापटनम, सामलकोट, राजमुंदरी,एलुर, विजायवाडा, ओंगोल, नेलर, रेनिगंट, वेलोर, सालेम, एरोड, कोइम्बतुर, पलककड, त्रिसुर, अलूवा, एर्नाकुलम, कोट्टायम, चेंगानूर, कोलम, तिरुवनथपुरम आणि नागार्कोइल यासारख्या रेल्वे स्थानकांमधून जाते.
या ट्रेनने प्रवास करण्यासाठी दिब्रुगढ ते कन्याकुमारी ट्रेनचे भाडे थर्ड एसी (3A) मध्ये 2970 रुपये, सेकंड सीटर (2S) मध्ये 730 रुपये, सेकंड एसी (2A) मध्ये 4400 रुपये आणि स्लीपर (SL) मध्ये 1155 रुपये आहे…
जगातील सर्वात लांब रेल्वेमार्ग :-
जगातील सर्वात लांब रेल्वेमार्ग रशियामध्ये आहे, रशिया जो जगातील सर्वात मोठा देश आहे. या ट्रेनच्या प्रवासात सहा दिवस लागतात आणि यात बर्याच timezone हि ओलांडल्या जातात. हे पश्चिम रशियाला देशाच्या अगदी पूर्वेस जोडते. ही ट्रेन मॉस्कोमध्ये आपला प्रवास सुरू करते आणि व्लादिव्हो स्टोक पर्यंत 6 दिवसांत सुमारे 9250Km इतके अंतर पार करते.
ज्याची तुलना भारताच्या सर्वात लांब रेल्वेमार्गाशी केली तर, ती दुप्पटीपेक्षा हि अधिक आहे. अचूक लांबी विषयी बोलायचं झाल्यास ते भारतीय रेल्वे मार्गापेक्षा ते 4,977Km लांब आहे. भारतीय रेल्वेकडे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे ज्यास 168 वर्षांचा इतिहास आहे आणि सन 2021 मधील आकडेवारीवर आधारित संपूर्ण देशाला व्यापून टाकणारा 1,26,611 Km ट्रॅक आहे.
दररोज लाखो लोक ट्रेनमध्ये प्रवास करतात. ट्रेन हे दळणवळणाचे माध्यम आहे जे खूप स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत. परंतु सध्याच्या ट्रेन तंत्रज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला आहे. पहिले वाफेवरचे इंजिन 1804 मध्ये ब्रिटनच्या रिचर्ड ट्रेविथिक यांनी लॉन्च केलं होतं.आज आपण आपल्याला ट्रेनबद्दल काही तथ्य सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही कधीही ऐकलंही नसेल.
2. 1760 च्या आधी थॉमस न्यूकॉमनने बनवलेल्या ट्रेन इंजिनमध्ये खूप त्रुटी होत्या. त्याला सतत गरम आणि थंड करावे लागत होतं, ते खूप कष्टाचं काम होतं. जेम्स वॅटने याबद्दल विचार केला आणि इंजिनला आर्थिकदृष्ट्या किफायत बनविण्यासाठी स्वतंत्र कंडेन्सर वापरला. त्याला वाटले कि,हि कल्पना सर्वांसमोर मांडताना एक युक्ती करावी लागेल,यासाठी त्याने एका गोष्टीची गणना केली कि, एक घोडा अश्व कितीवेळ कार्य करू शकतो. त्यानंतरचं Horse Power या युनिटचा शोध लागला.
2. अमेरिकेत तयार झालेल्या पहिल्या वाफेवरील चालणार्या लोकोमोटिव्ह ट्रेनचा घोड्या द्वारे ओढणाऱ्या ट्रेनने पराभव केला. खरं तर,अमेरिकन उद्योगपती पीटर कूपर यांनी बनविलेले पहिले स्टीम इंजिन 2 ऑगस्ट 1830 रोजी घोड्याच्या सहायाने चालणाऱ्या ट्रेनशी स्पर्धा करण्यासाठी मैदानात उतरवले होते.
या शर्यती दरम्यान,वाफेच्या इंजिनने लवकरच वेग पकडला आणि घोड्याला मागे टाकले, परंतु मध्यभागी असलेल्या इंजिनमधील एक पट्टा तुटला आणि त्याचा वेग कमी झाला, ज्यामुळे घोड्याने ट्रेन जिंकली.
3. अमेरिकन गृहयुद्धात या ट्रेनने नोर्थला खूप मदत केली होती. या युद्धाच्या वेळी, केवळ रेल्वेच्या मदतीनेच त्यांचे सैनिक आणि जड -सामग्री वाहून नेण्यास मदत केली. अब्राहम लिंकनने सप्टेंबर 1863 मध्ये 1200 मैलांच्या अंतरावर जॉर्जिया ट्रेनमार्गे वॉशिंग्टनहून सुमारे 20,000 बदली सैन्य पाठविले होते.
4.लंडन अंडर ग्राउंड हा जगातील ग्राउंड रेल्वे मार्गावरील पहिला मार्ग आहे.हा मार्ग 1863 मध्ये सुरू झाला. लंडनच्या रस्त्यांवरील वाढती रहदारी कमी करण्यासाठी हा मार्ग तयार करण्यात आला होता. त्यानंतरच 1900 मध्ये पॅरिस मेट्रो आणि 1905 मध्ये न्यूयॉर्क सब वे बांधले गेले.
5. रिचर्ड ट्रेविथिक हे एक खाण अभियंता होते जे लोकोमोटिव्ह इंजिन चालविण्यासाठी स्टीम वापरणारे पहिले मनुष्य होते. त्याचे पहिले इंजिन रेल्वेमार्गावर 4 किमी / तासापेक्षा कमी वेगाने चालले होते.