ॲडवांस्ड सेफ्टी फीचर्ससह 6 एअरबॅग्स ; तरीही ‘ही’ न्यू SUV Crash Test मध्ये फेल, सेफ्टीमध्ये मिळाली 0 रेटिंग्स…

0

शेतीशिवार टीम : 04 सप्टेंबर 2022 : 6 एअरबॅगसह ॲडवांस्ड सेफ्टी फीचर्ससह, Hyundai ची न्यू मिड साईज प्रीमियम SUV ‘Tucson’ सेफ्टीच्या दृष्टीने झिरो असल्याचे सिद्ध झालं आहे. म्हणजेच Hyundai ची ही SUV सेफ्टीच्या दृष्टीने अजिबात सेफ नाहीये. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 27.69 लाख रुपयांपासून सुरू होते.

लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये, Hyundai Tucson च्या 2 एअरबॅग मॉडेलला 0 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. तर, 6 एअरबॅगसह 2022 Hyundai Tucson ने 3 स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त केलं आहे. परंतु हे लक्षात घेण्यासारखं आहे की, भारतीय बाजारात ह्युंदाई टक्सनच्या नवीन मॉडेलची अद्याप क्रॅश टेस्ट झालेली नाही.

Hyundai Tucson चे क्रॅश टेस्टमध्ये प्रदर्शन :-

लॅटिन NCAP क्रॅश टेस्ट एजन्सीने 2 एअरबॅग मॉडेलची तसेच Hyundai Tucson च्या 6 एअरबॅग मॉडेलची टेस्ट केली, ज्यामध्ये Tucson ने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. 6 एअरबॅग असलेल्या मॉडेलला फक्त 3 स्टार रेटिंग मिळाले. Hyundai Tucson च्या 2 एअरबॅग असलेल्या मॉडेलला व्यस्क पॅसेंजरसाठी फक्त 20.09% पॉईंट मिळाले. याशिवाय चाइल्ड सेफ्टीसाठी 2.62% पॉईंट मिळाले आहेत. 6 एअरबॅगसह Hyundai Tucson बद्दल बोलायचं झालं तर त्याची कार्यक्षमता चांगली होती. व्यस्क पॅसेंजरच्या सेफ्टीसाठी, SUV ला एकूण 32.64 पॉईंट मिळाले आहेत. याने चाइल्ड सेफ्टीसाठी 34.07 पॉईंट मिळवले आहेत.

या क्रॅश टेस्टच्या रिझल्टनुसार, 2 एअरबॅगसह नवीन Hyundai Tucson च्या साइड पोल इम्पॅक्ट टेस्ट केली गेली नाही कारण वाहन साइड हेड सेफ्टी देत नाही. तसेच, सीटनेही व्यस्क पॅसेंजरच्या गळ्याला थोडंसं संरक्षण दर्शविलं आहे. मुलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने, रियर आउटबोर्ड पोजीशन स्टॅंडर्ड ISOFIX अँकरेज असूनही मार्किंग लॅटिन NCAP स्टॅंडर्डनुसार नव्हते.

इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, Hyundai Tucson 2.0-लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शनसह उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिन 151 bhp पॉवर आणि 192 Nm टॉर्क जनरेट करते, तर डिझेल इंजिन 184 bhp पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन ऍटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहेत. या SUV ची एक्स – शोरूम किंमत रु.27.69 लाख पासून सुरू होते.

फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, ह्युंदाईच्या या नवीन SUV मध्ये 8-इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमशिवाय ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, 10-वे पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हँड्स-फ्री टेलगेट ओपनिंग आणि वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग यांसारखे फीचर्स आहेत.

या SUV मध्ये ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सेफ्टीची देखील काळजी घेण्यात आली आहे आणि सेफ्टीसाठी, Tucson 6-एअरबॅग्ज, ABS, हिल स्टार्ट असिस्ट, ESC, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आणि पार्किंग कॅमेरा यांसारख्या फीचर्सचाही समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.