अजून किंमतही ठरली नाही, तरीही ‘या’ SUV ने मार्केटमध्ये घातलाय धुमाकूळ ; प्रचंड मागणीमुळे 6 महिन्यांपर्यंत वाढला व्हेटिंग पिरियड….

0

शेतीशिवार टीम : 1 सप्टेंबर 2022 : जपानी ऑटोमेकर टोयोटा आपली न्यू मिड-साइज SUV टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर (Toyota Urban Cruiser Hyryder) लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या SUV चे फीचर्स, टेक्नॉलॉजी, व्हेरिएंट, कलर यासंबंधित सर्व माहिती आधीच उघड केली असली तरी, फक्त त्याची किंमत उघड करणे बाकी आहे. या SUV च्या किंमतीचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही, मात्र टोयोटाच्या या SUVची जादू लोकांमध्ये खूप चालली आहे. त्याचे अधिकृत बुकिंग आधीच सुरू झाले असून प्रचंड मागणीमुळे या SUV चा व्हेटिंग पिरियड 6 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे.

जर तुम्ही या ऑगस्ट महिन्यात नवीन Toyota Hyryder बुक केली असेल तर तुम्हाला त्याची डिलिव्हरी पुढच्या वर्षी मार्चपर्यंत मिळणार आहे. कंपनीच्या बिडी प्लांटमध्ये SUV चे उत्पादन केलं जात आहे, जे दरवर्षी सुमारे 3.10 लाख वाहनांचे प्रॉडक्शन करण्यास सक्षम आहे.

सुझुकी – टोयोटाचे हे प्रॉडक्शन म्हणून ही SUV केलं जाणार आहे, परंतु, Toyota ने प्रॉडक्शनची जबाबदारी स्वीकारलेले हे पाहिलं मॉडेल आहे. यापूर्वी, दोन कंपन्यांमधील करारामुळे बलेनो बेस्ड ग्लान्झा, ब्रेझा बेस्ड अर्बन क्रूझर लॉन्च करण्यात आली आहे.

अलीकडेच, Toyota ने आपल्या प्रसिद्ध MPV इनोव्हा क्रिस्टा च्या डिझेल व्हेरियंटचे बुकिंग तात्पुरते थांबवण्याची घोषणा केली आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, ” जास्त मागणीमुळे, इनोव्हा क्रिस्टाच्या डिझेल व्हेरियंटचा व्हेटिंग पिरियड लक्षणीय वाढला आहे, ज्यामुळे कंपनीने तात्पुरते ऑर्डर घेणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

कशी आहे न्यू Toyota Hyryder :-

न्यू टोयोटा हायराइडरचे (Hyryder) फीचर्स म्हणजे ते माइल्ड हायब्रीड पॉवरट्रेन तसेच ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) व्हेरियंटमध्ये येतं. कंपनीने या SUV ला न्यू आणि फ्रेश लुक देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ती भारताव्यतिरिक्त इतर बाजारपेठांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते.

यामध्ये कंपनीने 1.5 लिटर क्षमतेचे TNGA इंजिन वापरलं आहे, जे 92hp पॉवर आणि 122Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन एका इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेलं आहे जे 79hp आणि 141Nm टॉर्क जनरेट करते.

हायब्रीड सिस्टम 177.6 V लिथियम-आयन बॅटरीसह जोडलेली आहे. अर्बन क्रूझर हायडर 25 Km पर्यंत दावा केलेल्या इलेक्ट्रिक-ओन्ली रेंजसह येते टोयोटाचं असं म्हणणं आहे की, हायब्रीड सिस्टम एकूण अंतराच्या 40% आणि प्युअर EV मोडमध्ये 60% अंतर कव्हर करू शकते. कंपनीचा दावा आहे की, ही SUV 27.97 kmpl पर्यंत मायलेज देते.

Toyota Hyryder चे हे आहेत खास फीचर्स :-

Toyota Urban Cruiser Hider मध्ये पॅनोरामिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हेड्स-अप डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक आणि गुगल आणि सिरी कंपॅटिबिलिटीसह व्हॉइस असिस्ट सारखे फीचर्स आहेत. इतर काही फीचर्समध्ये पॅनोरामिक सनरूफ, 17-इंच अलॉय व्हील, वायरलेस चार्जर, हेड्स अप डिस्प्ले आणि 360-डिग्री कॅमेरा यांचा समावेश आहे.

कंपनीने यामध्ये सेफ्टीचीही पूर्ण काळजी घेतली आहे, यात 6 एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ESP, हिल-होल्ड असिस्ट, सेकंड – रो च्या प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल आहे. कंपनीने अद्याप या SUV ची किंमत जाहीर केली नसली तरी आतापासून तिचा व्हेटिंग पिरियड 6 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.