Take a fresh look at your lifestyle.

असा असेल नाशिक चा लॉकडाऊन

0

नाशिक : कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी आज नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना भेट दिली. याशिवाय त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर लॉकडाऊन ची नियमावली जाहीर करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरासह राज्यात आणि नाशिक जिल्हा व शहरात संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी शहरासह उपनगरांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर गावागावांत संचारबंदी अधिक कडक करण्यात आली.

असा असेल लॉकडाऊन

उद्या रात्री ८ वाजेपासून नियमावली लागू

रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी मॉल , बार , रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय ,

डिलिव्हरी सर्व्हिस चालू सरकारी कार्यालय ५० टक्के क्षमतेनं काम करणार इंडस्ट्री चालू राहणार ,

कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही 6 बांधकाम चालू सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार

भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत . फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय

शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी ,

चित्रपटगृहे बंद सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार ,

बस , रेल्वे , टॅक्सी बंद राहणार नाहीत , पण त्यांच्यातील प्रवासी क्षमता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

मास्क बंधनकारक , क्षमतेपेक्षा ५० टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

Leave A Reply

Your email address will not be published.