‘या’ 3 बाइक्सने मार्केटमध्ये घातलाय धुमाकूळ, दमदार मायलेजसह जबरदस्त फीचर्स ; किंमत फक्त 55,450 रुपयांपासून स्टार्ट…

0

शेतीशिवार टीम : 29 ऑगस्ट 2022 : इंडियन मार्केटमध्ये कम्युटर सेगमेंट सर्वात प्रसिद्ध आहे, या सेगमेंटच्या बाइक्स त्यांच्या कमी किमत, जबरदस्त मायलेज आणि त्यांच्या विशेष उपयुक्ततेमुळे लोकप्रिय आहेत. सामान्यत: लोकांना बाईकचा मेटेनन्स म्हणलं की नको – नकोस होतं. अनेक वेळा लोकांना वेळेवर सर्व्हिस मिळू शकत नाहीत. याशिवाय वाहनांमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते.

पण आज आपण मार्केटमध्‍ये उपलब्‍ध असल्‍या परवडणार्‍या बाइक्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे कमी मेंटेनन्ससाठी प्रसिद्ध आहेत. या बाईक कमी किमतीतही चांगले मायलेज देतात, चला तर मग जाणून घेउया देशातील सर्वोत्कृष्ट लो-मेंटेनन्स बाइक्सबद्दल…

टीव्हीएस रेडिओन (TVS Radeon) :-

TVS Motors Radeon ही कमी किमतीत चांगला ऑप्शन ठरू शकते, ती केवळ किफायतशीर नाही तर अनेक अँडव्हान्स फीचर्सनी सुसज्ज आहे. यामध्ये 109.7cc क्षमतेचे सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन दिलं आहे, जे 8.19PS पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4 स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येतं. साधारणपणे, ही बाईक 80 kmpl पर्यंत मायलेज देते, पण हे मायलेज वेगवेगळ्या स्टाइल आणिरोड कंडिशननुसार बदलू शकते.

कम्युटर बाईक ऑफ द इयर व्हेरियंटमध्ये प्रीमियम ग्राफिक्स, नवीन रबर टँक ग्रिप आणि फ्युएल टॅकवर रबर स्टॅम्प आहे. यात यूएसबी (USB) चार्जिंग पोर्ट आणि बीपरसह साइड-स्टँड इंडिकेटर, Radeon Refresh ला रिव्हर्स मल्टी-कलर LCD डिजिटल क्लस्टर देखील मिळतो जो रिअल टाइम मायलेज, क्लॉक, सर्व्हिस इंडिकेटर, लो बॅटरी इंडिकेटर, टॉप स्पीड आणि अँव्हरेज दर्शवत आहे.

इतर फीचर्समध्ये हेडलाईट आणि क्रोम बेझल्समध्ये इंटिग्रेटेड LED DRL, एक ट्विन-पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि सिंगल-पीस लांब सीट यांचा समावेश आहे, जे टीव्हीएसचा दावा आहे की, ही या सेगमेंटमधील सर्वात लांब सीट आहे. ही बाईक चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 59,925 रुपयांपासून सुरू होते आणि 76,694 रुपयांपर्यंत जाते.

हिरो स्प्लेंडर प्लस (Hero Splendor Plus) : –

Hero Splendor Plus ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे, अनेक दशकांपासून या बाईकशी इतर कोणीही स्पर्धा करू शकलं नाही. कंपनीने या बाइकमध्ये 97.2cc इंजिन वापरले आहे, जे 8.01PS पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससह येतं. अलीकडे, कंपनीने त्याचे X-Tech व्हेरियंट देखील लॉन्च केलं आहे, जे आणखी चांगले ग्राफिक्स आणि फीचर्ससह येते.

स्प्लेंडर प्लस आता पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते, 100cc क्लबमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली आहे. कन्सोल ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि SMS अलर्ट, ड्युअल ट्रिपमीटर, मायलेज इंडिकेटर, लो फ्युएल इंडिकेटर यांसारखे फीचर्सही या बाइकमध्ये उपलब्ध आहेत. यात आता एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (DRL) देखील आहेत.

तसेच कंपनीने नवीन Splendor + XTEC मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर देखील समाविष्ट केलं आहे. डिजिटल डिस्प्लेमध्ये इनकमिंग आणि मिस्ड कॉल अलर्ट, न्यू मेसेज अलर्ट, RTMI (रिअल टाइम मायलेज इंडिकेटर) आणि कमी फ्यूल इंडकेटर इंडिकेटरसह दोन ट्रिप मीटर देखील मिळतात. त्याची किंमत 70,658 रुपये ते 74,928 रुपये आहे.

हिरो एफएच (Hero HF 100) :- 

Hero HF 100 हे प्रामुख्याने Deluxe चा स्वस्त व्हेरियंट आहे, कंपनीने या बाईकमध्ये 97.2 cc चे एअर-कूल्ड इंजिन वापरलं आहे, जे 8.36 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 9.1 लीटर क्षमतेची फ्युएल टॅंक आहे आणि ती फक्त एकाच व्हेरियंटमध्ये येते. फीचर्स म्हणून, कंपनीने त्यात अँनालॉग स्पीडोमीटर, ड्रम ब्रेक्स, किक स्टार्ट, स्पोक व्हील आणि फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजी वापरलं आहे.

ही एक बेसिक फीचर्स असलेली बाइक आहे, जी तिची किंमत कमीत कमी ठेवण्यास मदत करते. साधारणपणे ही बाईक 65 ते 70 kmpl चा मायलेज देते. या बाईकचे एकूण वजन 110 किलो आहे, आणि तिला 165 mm चा ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे, ज्यामुळे ही बाईक खडबडीत रस्त्यावरही सुरळीत चालण्यास मदत करते. त्याची किंमत फक्त 55,450 रुपये (Ex-showroom) आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.