Take a fresh look at your lifestyle.

Toyota कडून आता ही आगळी – वेगळी SUV लॉन्च ; पेट्रोलची बचत होणार 40% नी कमी, पहा फीचर्स अन् किंमत फक्त…

0

शेतीशिवार टीम : 2 जुलै 2022 : Toyota इंडियाने नवीन 2022 सब – कॉम्पॅक्ट SUV अर्बन क्रूझर हायरायडर (Urban Cruiser Hyryder) SUV लॉन्च केली आहे. जपानी कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) हायब्रिड मॉडेल म्हणून लॉन्च केली आहे. कंपनीने या कॉम्पॅक्ट SUV साठी बुकिंग देखील सुरू केलं आहे, हे मॉडेल कंपनीच्या अधिकृत साइटवरून तसेच ऑफलाइन डीलरशिपवरून ऑनलाइन केलं जाऊ शकतं. 

जे फक्त 25,000 रुपयांच्या टोकन रकमेवर उपलब्ध आहे. हे कंपनीचे हायब्रीड मॉडेल आहे, ज्यामुळे या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे नाव Hyryder देण्यात आलं आहे. या नवीन कॉम्पॅक्ट SUV च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊया…

कंपनीने अर्बन क्रूझर Hyryder SUV हे मॉडेल कंपनीच्या कर्नाटकातील बिदाडी प्लांटमध्ये बनवलं आहे. Glanza आणि Urban Cruiser नंतर Toyota-Suzuki पार्टनरशीप – अंतर्गत येणारी ही तिसरी कार असणार आहे. बाजारात आल्यानंतर ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा, mahindra XUV 300 आणि Kia Sonet सोबत थेट स्पर्धा करणार आहे.

Toyota अर्बन क्रूझर Hyryder SUV इंजिन आणि पॉवर :-

इंजिन आणि पॉवरच्या बाबतीत, Urban Cruiser Hyryder SUV मध्ये 1490 cc इंजिन आहे जे 5500 rpm वर 92.4PS पॉवर आणि 3800 – 4800 rpm वर 122Nm टॉर्क जनरेट करते. एकूण सिस्टम पॉवर 115.56PS पर्यंत आहे. यात लिथियम आयन 6 बॅटरी आहे आणि बॅटरी व्होल्टेज 177.6 व्होल्ट आहे. यात AC सिंक्रोनस मोटर आहे.

हायब्रीड सिस्टमची कमाल पॉवर 80.2 PS आहे आणि हायब्रीड सिस्टमची कमाल टॉर्क 141 Nm आहे. आणखी एक 1462 cc इंजिन दिले गेले आहे जे 6000 rpm वर 101.9PS ची पॉवर आणि 4400 rpm वर 135Nm टॉर्क जनरेट करते जे 5MT ट्रांसमिशनला जोडले जाते. अशा परिस्थितीत, जेव्हा ही कॉम्पॅक्ट SUV हायब्रिड मोडवर चालेल, तेव्हा ती सामान्य कारपेक्षा 40% कमी पेट्रोल वापरेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे हायब्रीड तंत्रज्ञान आतापर्यंत फक्त Camry सारख्या कारमध्ये होतं, जे यावेळी कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये देण्यात आलं आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन :-

Toyota Urban Cruiser Hyryder SUV मध्ये सेगमेंटची अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. यात ऑल-व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेन, पॅनोरॅमिक सनरूफ, हेड्स-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, 360-डिग्री कॅमेरा आहे. त्याचबरोबर एंटरटेनमेंट साठी 9-इंच स्मार्ट प्ले कास्ट आणि 55 हून अधिक कनेक्टेड फीचर्स देण्यात आलं आहे.

नवीन Toyota Urban Cruiser Hyryder ची किंमत 10 लाख ते 16 लाख रुपये (Ex-showroom) असण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.