ट्रॅक्टर ट्रॉली अनुदानाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांना यंत्र अवजाराच्या साहाय्याने शेती करून प्रगत होण्यासाठी केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत अनुदान दिलं जातं. या केंद्र / राज्य शासनाच्या राबवल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व योजना महाडीबीटी फार्मर (MahaDBT Farmers) पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जातात. (Tractor-Trolley Subsidy Maharashtra)
परंतु, ट्रॅक्टर ट्रॉली अनुदानासाठी टेस्ट रिपोर्ट उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या एक ते दीड वर्षापासून यांत्रिकीकरण योजनेमधून मधून ही बाब हटवण्यात आली होती. शेतकऱ्यांना नवीन अर्ज करताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची बाब निवडता येत नव्हती.
परंतु, आजच पुन्हा एकदा टेस्ट रिपोर्ट उपलब्ध झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॉली घेण्यासाठी ही बाब आपण ऍड करू शकता. या अंतर्गत 3 ते 5 टनांपर्यंत ट्रॉली तुम्ही अँड करू शकता.
परंतु, यासाठी शेतकऱ्यांकडे 20BHP ते 35BHP पर्यंतचा ट्रॅक्टर असणे गरजेचे आहे. तसेच त्या व्यक्तीच्या पोर्टलला माहिती जोडलेल्या कुटुंबातील इतर नातेवाईकडे ट्रॅक्टर असेल तर त्यालाही ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी अर्ज करता येणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो या लेखात आपण ट्रॅक्टर ट्रॉली योजनेबद्दल संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत जसे की, या योजनेची पात्रता, कागदपत्रे, योजनेचा उद्देश, लाभ, वैशिष्ट्ये, अर्ज कसा करायचा ? इ. त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा पूर्ण लेख वाचा…
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे :-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर 1 एकर तरी शेतजमीन असावी.
जमिनीची कागदपत्रे :- 7/12 व 8A
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट साइज फोटो
ओळख पुरावा (आधार कार्ड)
ट्रॅक्टरचे RC बुक
अर्ज भरताना सर्व्हे नंबर / गट नंबर माहिती असायला हवा.
लॉटरी लागल्यानंतर ही कागदपत्रे अपलोड करावे :-
ट्रॅक्टर ट्रॉली कोटेशन
टेस्ट रिपोर्ट
डिलिव्हरी चालान
बँक खाते पासबुक
आधार कार्ड
ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ?
1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.
2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये ‘अर्ज करा’ यावर क्लिक करा.
3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाब निवडायची आहे ‘कृषीयांत्रिकीकरण’ या ऑप्शनवर क्लिक करा.
4) यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जसे की, गाव, तालुका, मुख्य घटकमध्ये ‘कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य…
5) तपशील मध्ये ‘ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे’ निवडा, यानंतर ‘एच पी श्रेणी’ मध्ये 20BHP ते 35BHP पर्यंत किंवा ’35BHP पेक्षा जास्त’ हा ऑप्शन निवडा.
6) यंत्रसामग्री, अवजारे / उपकरणे या ऑप्शनमध्ये शेवटचा ऑप्शन दिसेल ‘वाहतूक साधने’ या ऑप्शनवर क्लिक करा.
7) यानंतर मशीनचा प्रकार या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ट्रेलर / ट्रॉली ( 5 टन क्षमतेपर्यंत) हा ऑप्शन निवडा.
8). यानंतर स्वयंघोषणापात्र वाचून ‘जतन करा’ वर क्लिक करा. तुमची बाब SUCCESS होईल.
9) तुम्हाला ट्रॅक्टर ची बाब तुमच्या प्रोफाइल मध्ये ऍड झालेली दिसेल.
7) यानंतर पुन्हा तुम्हाला मुख्य पृष्ठ वर जावं लागेल, अन पुन्हा ‘अर्ज करा’ वर क्लिक करावं लागेल. यानंतर ‘अर्ज सादर करा’ वरती क्लिक करा. यानंतर एक सूचना दाखवली जाईल ती वाचून OK करा.
8) OK केल्यानंतर तुम्हाला ‘पहा’ हा ऑप्शन दिसेल. पहा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी बाब निवडली आहे ती दिसेल. त्याला प्राधान्य क्रम देऊन पुन्हा अर्ज सादर करा वरती क्लिक करा.
10) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.
payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…