बाजार समितीत हळदीच्या दराने आता सोन्यालाही मागे टाकले आहे. मंगळवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात प्रति क्विंटल तब्बल 70 हजार रुपये भाव मिळाला आहे. बाजार समितीत विक्रीसाठी 17 हजार 525 पोती आली असून यातील 9358 पोती विकली गेली आहेत या हळदीला कमीत कमी 16 हजार 500 रुपये तर जास्तीत जास्त 70 हजार रुपये दर मिळाला.
सांगली बाजार समितीचे संचालक काडाप्पा सदाशिव वारद यांच्या संगमेश्वर ट्रेडर्स या अडत दुकानात मल्लिकार्जुन तेली रा. हदीगुंद, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव या शेतकऱ्याने हळद विक्रीसाठी आणलेली होती.
या हळदीला राजापुरी हळद सौद्यामध्ये 70 हजार रुपये प्रती क्विटल या विक्रमी दराने अकरा पोत्यांची विक्री झाली.
पहा आजचे नवे बाजारभाव..
श्रीकृष्ण कार्पोरेशन या पेढीने ही हळद खरेदी केली. सांगली बाजार समितीत हळद या शेतीमालास उच्चांकी भाव मिळत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. मंगळवारी 17,525 क्विंटल आवक होती यापैकी 9358 पोती इतकी विक्री झाली आहे.
या हळदीस कमीत कमी दर रुपये 16,500 व जास्तीत जास्त 70,000 इतका भाव मिळाला. बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी हळद मालधनी व अडत्यांचा सत्कार केला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली हळद सांगली बाजार समितीत विक्रीसाठी आणावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. यावेळी सचिव महेश चव्हाण, संचालक रमेश ई. पाटील उपस्थित होते.