ब्रेकिंग : तुमच्या जमिनीच्या 7/12 त मोठा बदल ; जमिनीचा नवा आधार ULPIN नंबर अन् QR कोड आला ; असा करा नवा 7/12 डाऊनलोड

0

शेतीशिवार टीम : 16 सप्टेंबर 2022 :- केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. डिजीटल इंडीया लॅन्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम (DILRMP) अंतर्गत संगणकीकृत झालेल्या अधिकार अभिलेखांसाठी अव्दितीय भूभाग ओळख क्रमांक ULPIN (Unique Land Parcel Identification Number) मिळाला आहे. महाराष्ट्र राज्यसहीत सर्व राज्यांना हा ULPIN नंबर मिळाला सुरुवात झाली असून आता जमिनीचं ही आधार कार्ड मिळणार आहे. या निर्णयामुळे निश्चितच नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे.

सदर निर्देशांत नमूद केल्यानुसार राज्यातील जमीनींना जिओ रेफरन्सिंग नुसार हे क्रमांक देण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक भूभागास अव्दितीय भूभाग ओळख क्रमांक (ULPIN) देण्यात आल्याने प्रत्येक भूमागास विशिष्ठ ओळख निर्माण होणार आहे.

तसेच नागरिकांना त्याचा फायदा होणार असून सहजरित्या ULPIN च्या आधारे जागेबाबत तपासणी करणे शक्य होणार आहे. ULPIN चा वापर Interconnectivity of various Systems म्हणजे Data Sharing साठी करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभागाच्या निर्देशांस अनुसरून राज्यातील प्रत्येक भूभागास अव्दितीय भूमाग ओळख क्रमांक (Unique Land Parcel Identification Number) देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

 

प्रत्येक भूमागास देण्यात येणारा अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक (ULPIN) हा विशिष्ट पध्दतीने (Random) तयार होणारा 11 अंकी क्रमांक असेल. अव्दितीय भूभाग ओळख क्रमांक ULPIN (Unique Land Parcel Identification Number) ग्रामीण व शहरी भागातील भूभागांना देण्याबाबतची कार्यपध्दती खालीलप्रमाणे विहीत करण्यात आला आहे.

7/12 – 8A उतारा ऑनलाईन कसा पहायचा अन् डाउनलोड कसा करायचा ? ते पाहूया….

1. महाभूलेख होमपेजवर जा…

7/12 उताडा रेकॉर्ड काढण्यासाठी सर्वप्रथम Bhulekh Mahabhumi च्या वेब पोर्टलवर जायचं आहे. कारण mahabhulekh maharashtra वेब पोर्टल स्थलांतरित झाले आहे.

गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in हे सर्च करून तुम्ही नवीन भुलेख महाभूमीच्या वेब पोर्टलवर जाऊ शकता. किंवा तुम्ही येथून थेट नवीन वेब पोर्टल उघडू शकता –  Click Here

2. विभाग निवडा.

महाराष्ट्र भूमि अभिलेख वेब पोर्टल स्क्रीनवर उघडताच उजव्या बाजूला ‘विभाग निवडा’ हा ऑप्शन दिसेल. सर्व प्रथम तुमचा विभाग निवडा आणि Go पर्यायावर क्लिक करा.

3. 7/12 रेकॉर्ड निवडा.

विभाग निवडल्यानंतर, स्क्रीनवर 7/12 आणि 8A रेकॉर्डचा पर्याय दिसेल. त्यात 7/12 निवडा. यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. स्क्रीनशॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे…

4. सर्वे नंबर / गट नंबर निवडा.

यानंतर तुम्हाला 7-12 रेकॉर्ड शोधण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन दिसतील. या सर्व ऑप्शनद्वारे, आपण सात 7/12 रेकॉर्ड मिळवू शकता. त्यातील सर्व्हे नंबर / गट नंबरचा ऑप्शन निवडा. त्यानंतर तुमच्या जमिनीचा सर्व्हे नंबर / गट नंबर भरा आणि ‘शोधा’ ऑप्शनवर क्लिक करा.

5. 7/12 ऑप्शनला निवडा. 

आता, सर्वप्रथम तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका. त्यानंतर ‘7/12 पहा’ ऑप्शनवर क्लिक करा. स्क्रीन शॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे…

6. Captcha Code verify करा.

पुढील स्टेपमध्ये Captcha Code verify करायचा आहे, यामुळे स्क्रीनवर दिलेला Code दिलेल्या बॉक्समध्ये भरा. त्यानंतर Verify Captcha To View 7/12 निवडा…

7. गाव नमुना सात पहा.

तुम्ही Captcha Code टाकून व्हेरीफाईड करताच, 7/12 रेकॉर्ड स्क्रीनवर उघडेल. यामध्ये पहिल्या गावाच्या नमुन्यात सात नोंदी मिळणार आहेत. त्यात दिलेले तपशील तुम्ही तपासू शकता…

8. गाव नमुना बारा पहा.

गाव नमुना सात खाली गाव नमुना बारा रेकॉर्ड देखील उपलब्ध असतील. त्यात दिलेले रेकॉर्डही तुम्ही तपासू शकता. तुम्हाला महाराष्ट्र जमीन कर हक्क नोंदींचे संपूर्ण तपशील मिळतील…

9. महाभूमि अभिलेख 7/12 Download करा।

तुम्ही तुमच्या जमिनीचे 7-12 उत्ता रेकॉर्ड डाउनलोड / प्रिंट देखील करू शकता. यासाठी ब्राउझर मेनूमधील प्रिंट ऑप्शन निवडा. त्यानंतर तुम्ही ते डाउनलोड किंवा प्रिंट काढू शकता…

अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील रहिवासी त्यांच्या जमिनीच्या 7-12 नोंदी ऑनलाईन मिळवू शकतात. सर्व्हे नंबर / ग्रुप नंबर व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या नावावर सात बार रेकॉर्ड देखील मिळवू शकता….

Leave A Reply

Your email address will not be published.