Take a fresh look at your lifestyle.

चिंचेचं पाणी आरोग्यासाठी वरदानचं, वजन कमी करण्यापासून ते ब्लड शुगर करेल कंट्रोल, असा करा USE…

शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021 : चिंचेचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. याचा उपयोग जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. विशेषतः चिंचेच्या पाण्याचा वापर चटणी, मुरब्बा, सांबार इत्यादींमध्ये केला जातो. पण चव वाढवण्यासोबतच चिंच आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर सुद्धा आहे,बहुतेक हे फार कमी लोकांना माहिती असेल.

यामध्ये आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, पोटॅशियम, फायबर भरपूर प्रमाणात असते. जे आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात मदत करते. फक्त चिंचच नाही तर चिंचेचे पाणी देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यास उपयुक्त :-

चिंच वजन कमी करण्यातही खूप उपयुक्त आहे. त्यात हायड्रॉक्सी ऍसिड असते, जे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून एन्झाईम्स वाढवण्यास मदत करते. त्यामुळे चिंचेच्या पाण्याचा आहारात समावेश करून वजन नियंत्रित ठेवता येते.

पिंपल आणि मुरुमांपासून आराम :-

चिंच पिंपल्स पासून आराम मिळवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. यासाठी चिंचेच्या बुटक्यांमध्ये लिंबाचा रस मिसळा, त्यानंतर ते बारीक करून फोडांवर लावा. त्यामुळे बराच दिलासा मिळेल.

कॅन्सर :-

चिंचेच्या पाण्यात अँटि-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका टळतो.

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर :-

मधुमेहाच्या रुग्णांनी चिंचेचे सेवन अवश्य करावे. हे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात नियंत्रित करण्यात मदत करते. त्यामुळे तुम्ही दिवसातून एकदा चिंचेच्या पाण्याचे सेवन करावं.

पचनशक्ती चांगली राहते :-

पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी चिंचेचे पाणी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पोटात जळजळ, बद्धकोष्ठता किंवा सूज येणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी चिंचेचे पाणी खूप फायदेशीर आहे.