शेतीशिवार टीम, 15 जून 2022 : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अनेकदा सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी मुलाखतीचा अनुभव आणि त्या बहुतेक प्रश्न सामान्य ज्ञानाचे (general knowledge) असतात. UPSC किंवा MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराना चालू घडामोडींचे प्रश्न विचारले जातात.
आपण आज अशाच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल जाणून घेणार आहोत. जे तुम्हाला तुमच्या तयारीसाठी तसेच तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी फायदेशीर ठरू शकतात. ते प्रश्न कोणते आहेत आणि त्यांची उत्तरे काय आहेत ते जाणून घेऊया…
प्रश्न : जगातील असा कोणता प्राणी आहे, ज्याचे शरीर पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे ?
उत्तर : आर्माडिलो (Armadillo) हा असा प्राणी आहे, ज्याचे शरीर पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे. हा प्राणी दक्षिण अमेरिकेत आढळतो.
प्रश्न : इंजेक्शन टोचण्यापूर्वी जी भीती निर्माण होते, त्याला काय म्हटलं जातं ?
उत्तर : इंजेक्शन टोचण्यापूर्वी जी भीती निर्माण होते त्याला ट्रायपॅनोफोबिया (Trypanophobia) म्हणतात.
प्रश्न : डास (Mosquitoes) किती उंचीपर्यंत उडू शकतो ?
उत्तर : तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, डास सुमारे 50 फूट उंचीपर्यंत उडू शकतो.
प्रश्न : असा कोणता जीव आहे, जो आपले पाय चालण्यासाठी नव्हे तर झोपण्यासाठी वापरतो ?
उत्तर : वटवाघुळ (Bats) हा असा प्राणी आहे, जो आपले पाय झोपण्यासाठी वापरतो.
प्रश्न : कॅमेराला हिंदीत काय म्हणतात ?
उत्तर : कॅमेरा (Camera) याला हिंदीत ‘प्रतिबिम्ब पेटी’ म्हणतात.
प्रश्न : मानवी मेंदू कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही ?
उत्तर : मानवी मेंदू अन्न आणि धोक्याकडे इच्छा असूनही दुर्लक्ष करू शकत नाही.
प्रश्न : जगातील सर्वाधिक कार असणारं शहर कोणतं ?
उत्तर : जगातील सर्वाधिक कार ‘दिल्ली’ या शहरात आहेत.
प्रश्न : भारतावर सगळ्यात पाहिलं आक्रमण कोणी केलं ?
उत्तर : भारतावर आक्रमण करणारा पहिला (अरबी) मुस्लिम शासकः मुहम्मद बिन कासिम होता. (ई. स 712 मध्ये).
प्रश्न : प्लाझ्मा हे नेमकं काय आहे, ते शरीरात कसं कार्य करतं ?
उत्तर : प्लाझ्मा (Plasma) हा रक्ताचा एक द्रव भाग आहे, ज्यामध्ये स्वतःच महत्त्वपूर्ण घटक असतात. त्याचे बाह्यतः रक्तातील द्रव्यमान 50% पेक्षा जास्त असतं. प्लाझ्मा (Plasma) हा थोडासा पिवळसर रंग असलेला एक गढूळ द्रव आहे, हे द्रव एखाद्या व्यक्तीला देण्यासाठी ते कृत्रिमरित्या तयार केलं जातं.
प्लाझ्मा प्रोटीन अनेक महत्वाची कार्ये करतात, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे पोषक – रक्त पेशींमध्ये प्रोटीन कॅप्चर करणे आणि विशेष एन्झाईम्सच्या मदतीने त्यांचे विभाजन करणे, ज्यामुळे त्यांचे आत्म-संरक्षण सुलभ होतं…
प्रश्न : असं काय आहे, जो विकत तर घेतो पण घालत नाही अन् जो घालतो तो विकत घेत नाही ?
उत्तर : कफण (प्रेतावर घालण्याचे किंवा प्रेत गुंडाळण्याचे वस्त्र )