शेतीशिवार टीम, 16 जून 2022 : आपण सर्वानी लहानपणी शाळेत असताना ABCD लिहिली, पण कधी तुमच्या मनात असा विचार आला का की, ABCD मधील i आणि j वर बिंदू का लावला जातो ? त्या बिंदूंना काय म्हंटल जातं ? आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात पण त्या आपल्या लक्षात येत नाहीत. परंतु तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना या छोट्या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचं ठरतं.
UPSC परीक्षा किंवा कोणत्याही बँकेच्या नोकरीसाठी (current affairs) लेखी परीक्षेत सामान्य ज्ञानाचे (general knowledge) प्रश्न देखील उमेदवारांकडून विचारले जातात. तसेच इंटरव्हिव्ह दरम्यान, कधीकधी असे अवघड प्रश्न विचारले जातात, ज्याची उत्तरे चांगल्या उमेदवारांना देणे कठीण बनतं. अशाच मुलाखत किंवा लेखी परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या general knowledge काही प्रश्नांबद्दल जाणून घेणार आहोत.
प्रश्न : पांढरं सोनं कशाला म्हटलं जातं ?
उत्तर : जगात अनेक प्रकारच्या वस्तूंची सोन्याशी तुलना केली जाते, परंतु प्लॅटिनम हे पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं.
प्रश्न : असं कोणतं फळ आहे, जे आपण खाऊ शकत नाही ?
उत्तर : मेहनतीचं फळ
प्रश्न : असं काय आहे जे जेवढं जास्त तुमच्या जवळ राहतं तितकं तुम्हाला कमी दिसू लागतं ?
उत्तर : अंधार ही अशी गोष्ट आहे, जे जेवढं जास्त तुमच्या जवळ राहतं तितकं तुम्हाला कमी दिसू लागतं ?
प्रश्न : i आणि j वरील डॉटला काय म्हटलं जातं ?
उत्तर : इंग्रजीमध्ये दोनच शब्द आहेत ज्यामध्ये डॉट वापरला आहे. ते i आणि j आहेत. त्यावरील डॉटला Tittle म्हटलं जातं.
प्रश्न : पिवळी क्रांती कोणी व कोणासाठी केली ?
उत्तर : 1980 च्या दशकात जेव्हा देशाच्या तेलबियांची आयात चिंताजनक पातळीवर पोहोचली होती, तेव्हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वतः हस्तक्षेप करून तेलबियांवर तांत्रिक मोहीम सुरू केली होती त्यामुळे त्यांना पिवळ्या क्रांतीचे जनक म्हटलं जातं.
प्रश्न : विधानसभेचा सदस्य नसतानाही एखादा मंत्री किती काळ पदावर राहू शकतो ?
उत्तर : 6 महिन्यापर्यंत
प्रश्न : वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करीत ?
उत्तर : राष्ट्रपती
प्रश्न : कोणत्या राज्यात विधानपरिषदेचे सर्वाधिक सदस्य आहेत ?
उत्तर : उत्तर प्रदेश
प्रश्न : भारताच्या संविधान सभेच्या फेडरल पॉवर्स कमिटीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर : प . जवाहरलाल नेहरू
प्रश्न : कागद व पेन सोडला तर, असं काय आहे, जे लिहिण्यासाठी व वाचण्यासाठी वापरलं जातं ?
उत्तर : चष्मा, याचा उपयोग लिहिणे आणि वाचणे या दोन्हीसाठी केला जातो.
प्रश्न : भारतात सलग दोन वेळा राष्ट्रपती राहिलेले नेते कोण होते ?
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद ( कार्यकाळ :- 1952 ते 1962 पर्यंत )