महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने भुसावळ ते मनमाड दरम्यान 183.94 किमी लांबीच्या तिसऱ्या रेल्वे ट्रॅकच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. भुसावळ ते पाचोरा दरम्यान 71.72 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात आला आहे. पाचोरा ते मनमाड दरम्यान उर्वरित 112.22 किमी मार्गाचे काम सुरू आहे. त्यादृष्टीने भुसावळ यार्डात 14 व 15 ऑगस्ट रोजी 15 तासांचा विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत 40 हून अधिक मेल – एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेने ब्लॉकमुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससह इतर काही मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही मेल – एक्स्प्रेस गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत. काही गाड्या अंशतः रद्द राहतील..
मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भात सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील काही रद्द केलेल्या गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :-
13 ऑगस्ट रोजी या गाड्या राहणार रद्द :-
– 12071 सीएसएमटी – जालना जनशताब्दी
– 11401 मुंबई – आदिलाबाद
– 17618 हजूर साहिब नांदेड – मुंबई
14 ऑगस्ट रोजी या गाड्या राहणार रद्द :-
22223/4 सीएसएमटी – साईनगर – सीएसएमटी शिर्डी वंदे भारत
– 11113 देवलाली – भुसावळ
– 17617 सीएसएमटी – नांदेड
– 12071/2 सीएसएमटी – जालना – सीएसएमटी जनशताब्दी
– 12139 मुंबई – नागपूर सेवाग्राम
– 11401/2 मुंबई – आदिलाबाद-मुंबई
– 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी
– 17057 मुंबई सिकंदराबाद देवगिरी
– 17618 हजूर साहिब नांदेड-मुंबई
15 ऑगस्ट रोजी या गाड्या राहणार रद्द :-
– 11113 देवलाली – भुसावळ
– 17617 सीएसएमटी – नांदेड
– 12139 मुंबई – नागपूर सेवाग्राम
– 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी
– 17057 मुंबई सिकंदराबाद देवगिरी
– 07427 LTT – हजूर साहिब नांदेड
या गाड्या अंशतः राहणार रद्द..
14 ऑगस्ट रोजी धावणारी 12109 मुंबई – मनमाड एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकावर रद्द राहील. 15 ऑगस्ट रोजी नाशिकरोडमार्गे मुंबईकडे प्रयाण होईल.
12131 दादर – साईनगर शिर्डी रेल्वे प्रवास 14 ऑगस्टपासून पुणे – दौंड मार्गे धावेल..
प्रभावित गाड्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
https://twitter.com/Central_Railway/status/1690277778846085120?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1690277778846085120%7Ctwgr%5E8b2cb05f396c703ea1089bde291d71b4bc26a8d9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.patrika.com%2Fmumbai-news%2Fmaharashtra-more-than-40-mail-express-train-affected-mumbai-shirdi-vande-bharat-canceled-on-14-august-8429719%2F