भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्यास दिलेल्या सवलतीस 8 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध झाले असून यापूर्वीच्या सवलतीच्या नियमाला मुदतवाढ देताना, काही नव्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

भोगवटदार वर्ग – 2 आणि भाडेपट्टाने प्रदान केलेल्या जमिनींचे भोगटवदार वर्ग -1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्याच्या रकमेत सवलत देण्यात आली होती. तसा महाराष्ट्र जमीन महसूल ( भोगवटादार वर्ग -2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमीन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करणे) (सुधारणा) नियम 2019 प्रसिद्ध करण्यात आला होता.

त्यानुसार सवलतीची रक्कम आकारण्याबाबत 8 मार्च 2022 पर्यंत पर्यंत मुदत होती. या सवलतीचा प्रदान कालावधी संपल्यानंतर त्यात मुदतवाढ करावी म्हणून विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी सुरू होती. विधिमंडळातही हा विषय मांडण्यात आला होता.

त्यानुसार, 27 मार्च रोजी राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले असून 2019 च्या या नियमानुसार देण्यात आलेली तीन वर्षांची मुदत पाच वर्षे करण्यात आली आहे. त्यामुळे या सवलतीचा लाभ 8 मार्च 2024 पर्यंत घेता येणार आहे.

अशा आहेत नव्या तरतुदी :-

अधिमूल्याची रक्कम एक कोटींपेक्षा अधिक असेल, तसेच शर्थ भंग झाला असेल, तर राज्य शासनाची पूर्व मान्यता आवश्यक राहणार आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून जमीन प्रदान केल्यानंतर मूळ प्रयोजनार्थ प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच वर्ग – 2 ची जमीन वर्ग -1 ची करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देता येतील.

भोगवटादार वर्ग दोनची जमीन एनए (NA) करताना 25% रक्कम भरून घेतली जाते. ती रक्कम वर्ग एक करताना अधिमूल्यातून कमी केली जात होती, यापुढे ही रक्कम वगळली जाणार नाही.

अशी आहे सवलत :-

शेत जमीन – रेडिरेकनरच्या 50% अधिमूल्य.

औद्योगिक, वाणिज्य कारणासाठी कब्जेहक्क, ‘भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनी – रेडिरेकनरच्या 50% अधिमूल्य.

रहिवासी कारणांसाठी कब्जेहक्काने धारण केलेल्या जमिनी – रेडिरेकनरच्या 15% अधिमूल्य.

रहिवासी कारणासाठी भाडेपट्टयाने धारण केलेल्या जमिनी – रेडिरेकनरच्या 25% अधिमूल्य.

सहकारी गृह निर्माण संस्थांना भाडेपट्टयाने दिलेल्या व सहकारी संस्थांच्या भोगवट्यात असलेल्या जमिनी तसेच कब्जेहक्काने दिलेल्या जमिनी – रेडिरेकनरच्या 15% अधिमूल्य.

दोन्ही जमिनींमधला फरक अन् अर्जाचा नमुना संच PDF पाहण्यासाठी.. 

Kanda Anudan Yojana Form

इथे क्लिक करा (PDF Form)

आवश्यक कागदपत्रे :-

जमिनीच्या मालकाचा विनंती अर्ज
प्रतिज्ञापत्र
जमिनीचे 50 वर्षांचे उतारे व खाते उतारा
7/12 उताऱ्यावर सर्व फेरफार नोंदी
एकत्रीकरणाचा मूळ उतारा
आकारबंदाची मुळ प्रत
मुळधारकास जमिन कशा मिळाला याबाबत कबुलायत / आदेशाची नक्कल
तलाठी यांचेकडील वन जमीन नोंदवहीचा उतारा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *