वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेला खरं पण, यामध्ये पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रानं खूप काही गमावलं ; पहा, हा स्पेशल रिपोर्ट…

0

शेतीशिवार टीम : 14 सप्टेंबर 2022 : वेदांता – फॉक्सकॉन यांच्या संयुक्त भागीदारीतील तब्बल 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार निर्माण करणारा सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन प्रॉडक्शन प्रोजेक्ट पुण्यातील तळेगावमधून गुजरातमधील धोलेरा येथे हलवण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली आहे.

आता हा प्रोजेक्ट गुजरातमधील धोलेरा येथे हलवण्यात आला आहे. याबतच ट्विट काल वेदांताचे चेयरमन अनिल अग्रवाल यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी आणि बंडखोर – भाजप सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे.

से असले तरी गुजरात मधीलधोलेरा येथे तळेगावच्या तुलनेत कोणत्याच पुरेशा सुविधा नसल्याचा अहवाल खुद्द वेदांता – फॉक्सकॉन कंपनीने बनवला होता. त्यानुसार हा प्रकल्प तळेगावातच होणार होता. आता मात्र राजकीय हस्तक्षेपामुळेच हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याचे स्पष्ट झालं आहे.

नेमका काय आहे, हा वेदांत – फॉक्सकॉन प्रोजेक्ट, पहा :-

भारतात सेमीकंडक्टरचे उत्पादन होत नाही. हे सेमीकंडक्टर कार आणि इलेक्ट्रानिक गॅजेटसाठी गरजेचे असते. भारत सध्या चीनकडून सेमीकंडक्टरच्या चीप आयात करतो. सेमीकंडक्टरचा तुटवडा भासत असल्यामुळे भारतात आजही वाहनांचे 6 ते 10 महिन्यांचा व्हेटिंग पिरियड आहे.

भारतात सेमीकंडक्टर उत्पादन करून त्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत सरकारने पुढार घेतला होता. त्यानुसार तैवानमधील फॉक्सकॉन आणि भारतातील अनिल अग्रवाल यांच्या वेदांता ग्रुपमध्ये संयुक्त भागीदारी करण्यात आली. यानंतर या कंपनीने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, या राज्यांत प्रोजेक्ट बद्दल चाचपणीही केली होती आणि महाराष्ट्राची निवड केली होती. यामध्ये गुजरात राज्याचं नावही नव्हतं, पण अचानक गुजरात राज्याचं नाव आलं कुठून हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

वेदांता – फॉक्सकॉनने का केली होती पुण्यातील तळेगावची निवड :-

कंपनीला आवश्यक असणारी इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रानिक हब, रस्ते, रेल्वे, पुणे, नवी मुंबई व मुंबई आदी अंतराराष्ट्रीय हवाई वाहतूक कनेक्टिव्हिटी, जलवाहतुकीसाठी उरण येथील 100 Km वर असलेले जेएनपीटीशी कनेक्टिव्हिटी, उपलब्ध असलेले कुशल व तांत्रिक मनुष्यबळ, शैक्षणिक संस्था, औद्योगिक वातावरण, हवामान, 10 Km किमीवर असणारे आंद्रा धरणातील मुबलक पाणी, वीज, मूलभूत पायाभूत सुविधा, कंपनीला हवी असलेली 1100 एकर सलग जमीन उपलब्ध, पुणे परिसरात सुटे पार्ट पुरवणाऱ्या 150 हून अधिक पुरवठा कंपन्यांची साखळी आणि महाराष्ट्र राज्याचे गुंतवणुकीबाबतचे पोषक धोरण आदी सर्व बाबी लक्षात घेऊन फॉक्सकॉन कंपनीने तळेगावची निवड केल्याचे आपल्या अंतर्गत अहवालात म्हटले होते.

सोबतच, महाराष्ट्र सरकारने कंपनीला 30% भांडवली अनुदान, जमीन, पाणी, वीज आणि सांडपाणी आदी सुविधा उपलब्ध करून देणे, स्टॅम्प ड्युटी सूट, वीज दरात सवलत, रोजगार निर्माण केल्याबद्दल लाभांश आदी सेवा – सुविधा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. म्हणजे ही सर्व 39,000 कोटींच्या करापासून मुक्त केलं होतं.

तसेच वेदांत ग्रुप तळेगावात उभारणाऱ्या 750 मेगावॅट सोलर प्रकल्पाला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार होते. या वरील सर्व बाबी पाहता फॉक्सकॉनने तळेगावची निवड केली होती.

दुसरीकडे गुजरातमधील धोलेरामध्ये तळेगावच्या तुलनेत पुरेशा सुविधा नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पुण्याच्या तुलनेत अभियांत्रिकी व व्यवस्थापनाची उत्तम महाविद्यालये नसल्याने धोलेरामध्ये कुशल व तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव, धोलेरात सलग जमीन नसल्याने व दलदलीची असल्याने ती विकसित करण्यास मोठा खर्च, पीपावा बंदर 200 Km अंतरावर, कनेक्टिव्हिटीचा अभाव, दमट व प्रतिकूल वातावरण, धोलेराच्या नजीक कोणतेही शहर उभे राहत नसणे, धोलेरात पाण्याची कमतरता असून, नर्मदा कॅनॉलमधून पाण्याची सोय होईल पण अपुरी व खर्चिक असल गुजरात सरकार 5 हजार मेगावॅट तर टाटा पॉवर 100 मेगावॅट सारऊर्जा प्रकल्प उभारून कंपनीला वीज उपलब्ध करून दिली जाईल, असे कंपनीच्या अंतर्गत अहवालात नमूद करण्यात आलं होतं. मग असं काय झालं की, हा प्रकल्प गुजरातला गेला. याबाबत चौकशी करण्याची मागणीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे

महाराष्ट्राने काय गमावलं ?

1) महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीत दरवर्षी 2 हजार 200 कोटी रुपयांचा GST गमावला.

2) राज्याच्या दरडोई वार्षिक उत्पन्नात (GDP) 18 ते 20% गमावला.  

3) राज्यातली 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक गेली.

4) 1.54 लाख रोजगार निर्मितीसह 1.20 हजार लोकांचा रोजगारही गेला. 

5) पुण्यातील तळेगाव ही इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणून ओळखली जाणार होती, तेही गमावलं.

6) जागतिक आणि उद्योग क्षेत्राची नाराजी.

Leave A Reply

Your email address will not be published.