Virar-Alibaug Corridor बाबत मोठं अपडेट ! 93% जमीन संपादित, 2 फेजमध्ये बांधकाम होणार सुरु; 5 तासांचा प्रवास अवघ्या दीड तासात शक्य होणार..

0

गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या विरार – अलिबाग कॉरिडॉरच्या बांधकामाला अखेर 2024 मध्ये सुरुवात होणार आहे. MMR चा महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरअखेरपर्यंत 80 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

पुढील वर्षी मार्च – एप्रिलपर्यंत प्रोजेक्टसाठी लागणारी संपूर्ण जमीन महापालिकेकडे असणार आहे. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये सुमारे 128 Km लांबीच्या कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. पालघरमध्ये सुमारे 93 टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. ठाणे आणि रायगडमध्ये भूसंपादनाचे काम सुरू असून कॉरिडॉरचे बांधकाम 2024 च्या मध्यापर्यंत सुरू होणार आहे. (Virar-Alibaug Corridor)

दोन फेज मध्ये होणार बांधकाम..

कॉरिडॉरचे बांधकाम दोन टप्प्यात केले जाणार आहे. एका टप्प्यात 98 Km आणि दुसऱ्या टप्प्यात 29 Km चा मार्ग तयार करण्यात येणार आहे. नागरिकांना MMR च्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी सरकारने सुमारे 11 वर्षांपूर्वी 126 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार केला होता, परंतु विविध कारणांमुळे प्रकल्पाचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. आता सरकारने कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे..

रिंग रोड..

विरार – अलिबाग प्रोजेक्ट तयार करून, MMR मध्ये रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. त्यासाठी MMR चे सध्या सुरू असलेले सर्व प्रोजेक्ट एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत विरार अलिबाग कॉरिडॉर, शिवडी – न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट, शिवडी – – वरळी कनेक्टर, वसई – भाईंदर ब्रिज, कोस्टल रोड, वर्सोवा – वांद्रे सी लिंक आणि वांद्रे – वरळी सी लिंकसह अन्य प्रोजेक्ट जोडले जाणार आहेत. यातील शिवडी- न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टवर येत्या दोन ते तीन महिन्यांत वाहनांची ये – जा सुरू होणार आहे..

विरार ते अलिबाग प्रवास 2 तासांत होणार शक्य.

कॉरिडॉरच्या बांधकामामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या दीड ते दोन तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या विरारहून अलिबागला जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. 128 Km लांबीच्या कॉरिडॉरचा पहिला DPR 2016 मध्ये तयार करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांतील परिस्थितीतील बदलांनंतर DPR मध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी कॉरिडॉरच्या बांधकामाची जबाबदारी MMRDA कडे होती, मात्र भूसंपादन प्रक्रियेतील विलंब पाहता सरकारने कॉरिडॉरच्या बांधकामाची जबाबदारी MSRDC कडे सोपवली आहे..

विरार-अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडॉर : –

फेज – 1

विरार-अलिबाग मल्टी – मॉडल कॉरिडॉरचा फेज -1 हा नवघर ते बलावली दरम्यान बांधला जाणारा 96.41 किलोमीटरचा एक्सप्रेस – वे असून पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी 1,347 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीची आवश्यकता आहे, ज्याचा अंदाजे 40,000 कोटी रुपयांचा खर्च आहे..

फेज – 2

विरार – अलिबाग मल्टी – मॉडल कॉरिडॉरचा टप्पा 2 हा बलावली ते अलिबाग असा 29.9 किमीचा एक्सप्रेस – वे असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट..

MMR च्या वाढीला गती देण्यासाठी विरार – अलिबाग कॉरिडॉरची संकल्पना करण्यात आली होती, परंतु विविध कारणांमुळे हे काम रुळावर येऊ शकले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संपूर्ण एमएमआर रिंगरोडला जोडण्यास प्राधान्य दिले. यानंतर हा प्रकल्प एमएमआरडीएकडून एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आला.

गेली 10 वर्षे नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने असे मोठं – मोठे प्रोजेक्ट करण्याचा अनुभव त्यांना आहे. एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून अत्यंत कमी कालावधीत बांधकामाला सुरुवात केली. त्यामुळे मे महिन्यात काम सुरू झाल्यानंतर हा प्रकल्प रखडणार नाही, अशी अपेक्षा आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.