यंदा दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यातील तीन मुहूर्तानी लग्न सोहळ्यांना सुरुवात होत आहे. नोव्हेंबर २०२३ त जुलै २०२४ या कालावधीत ६६ लग्न मुहूर्त आले आहेत. मागील वर्षीीपक्षा यंदा मुहूर्त अधिक आले आहेत. ४४ गारज मुहूर्ताचा वागढी आला आहे.
त्यामुळे दिवाळीनंतर लग्नाचा बॅण्ड वाजणार आहे. मात्र, वैशाखमध्ये लग्न करू इच्छिणाऱ्यांना यंदा या महिन्यात एकही मुहूर्त उपलब्ध नाही. दसरा संपला की दिवाळीचे वेध सुरू होतात.
वधू – वरांकडील मंडळी ठरलेल्या मुहूर्तावरील लग्नाच्या तयारीला लागतात. दिवाळीतील तुळशी विवाह झाल्यावर विवाह सोहळ्याचे मुहूर्त येतात. नोव्हेंबरमध्ये २७, २८ आणि २९ या तीन तारखांना विवाहासाठी मुहूर्त आहेत.
डिसेंबर २०२३ मध्ये एकूण १० मुहूर्त असून, त्यात ६, ८, १५, २०, २१, २५,२६ आणि ३१ या तारखांचा समावेश आहे.
जानेवारी २०२४ मध्ये २, ६, ८, १७, २२, २७, ९ या तारखा लग्नासाठी आहेत.
वैशाखात अधिक मुहूर्त असतात मात्र, ३ मे २०२४ ते २८ जून २०२४ पर्यंत लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. त्यामुळे तब्बल ५६ दिवस मंगल कार्यालय, मंगल भांडार तसेच लग्न सोहळ्यांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना बसून राहावे लागणार आहे.
मात्र, गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक लग्न मुहूर्त आहेत. काही मंडळींना गोरज मुहूर्तांवर लग्न लावण्याची इच्छा असते, अशांसाठी नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ मध्ये ४४ गोरज मुहूर्त आले आहेत. त्यामुळे अनेकांना आनंद झाला आहे. (wedding dates in 2024)
नोव्हेंबर ते जुलै ६६ मुहूर्त..
नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत लग्नाचे ६६ मुहूर्त आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा ८ मुहूर्त अधिक आले आहेत. तसेच ४४ गोरज मुहूर्ताचा योगही आहे. त्यामुळे वर व वधूकडील मंडळी आतापासूनच तयारीला लागली आहेत. मंगल कार्यालयांची बुकिंग होत आहे.
मागील वर्षीपेक्षा यदा ८ मुहूर्त अधिक आहेत. परंतु, वैशाख महिन्यात एकही लग्न मुहूर्त नाही. साधारणपणे गणपती उत्सव, दसरा झाल्यावर लग्न सोहळ्यासाठी वधू – वराकडील मंडळी कामाला लागतात. ग्राहकांना नवे काही तरी देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत लग्नाचे ६६ मुहूर्त आहेत अशी माहिती पुरोहित गोविंद शर्मा यांनी दिली आहे.