जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद अनुदानावर विविध योजना राबविण्यात येत आहेत . या योजनांचा लाभ घेऊन पशुपालकांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन जि. प. प्रशासक  तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. 

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जि. प. सेस फंडामधून 75% अनुदानावर शेळीगट वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये 2 शेळ्यांचे युनिट विधवा, परित्यक्ता, दारिद्र्यरेषेखालील महिला व निराधार महिलांना देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी 12 हजार 400 रुपये अनुदान मर्यादा निश्चित केलेली आहे. तसेच सेस फंडातूनच अनुदानावर कडबाकुट्टी मशीनचा पुरवठा करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी विहित मापदंडाच्या कडबाकुट्टी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध असून, लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत पंचायत समिती स्तरावर स्वीकारण्यात येणार आहेत.

पात्र व गरजू लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. मशीन खुल्या बाजारातून खरेदी केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने 50% अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

अर्ज कसा अन् कुठे कराल ? 

या योजनेअंर्तगत तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील पंचायत समितीमार्फत अर्जाचा नमुना घेऊन अर्ज करू शकता…

टीप :- ज्या जिल्ह्यांतील अर्ज सुरु झाले असतील तर त्याबाबत आपण अपडेट घेणारच आहोत. परंतु, ज्या जिल्ह्यांत अर्ज सुरु झाले नसतील तर आपणही या योजनेबाबत अपडेट घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *