Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र हवामान अपडेट ! राज्यातील 12 जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती..

9

देशातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्ये तीव्र उष्णतेच्या विळख्यात आहेत. हवामान खात्याने उष्णतेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आयएमडीनुसार, पुढील काही दिवस मध्य, वायव्य, पूर्व भारत आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की, पुढील 3 दिवसांत अनेक राज्यांचे कमाल तापमान वाढेल. उत्तर, पूर्व आणि मध्य भारतात तापमान दोन ते चार अंशांनी वाढू शकते. हवामान खात्यानेही उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे..

विदर्भात सूर्य चांगलाच तापल्याचे चित्र असून, उष्णतेचा पारा जवळपास 46 अंशावर पोहोचला आहे. उन्हाच्या चटक्याबरोबरच अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असून, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील विदर्भ, मराठवाडासह मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्यात उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. अंगाची लाही लाही होत असून, विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेची लाट आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मालेगाव, जळगाव, पुणे, नाशिक तर मराठवाड्यातील परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर येथे उष्ण व दमट हवामान आहे.

दरम्यान, राज्यात 28 ते 30 एप्रिलपर्यंत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

9 Comments
  1. Alexander1707 says
  2. Frederick3345 says
  3. Lisa1431 says
  4. Vincent1757 says
  5. Horace2547 says
  6. Maria3950 says
  7. Ebony352 says
  8. Lyla4121 says
  9. Stella2167 says
Leave A Reply

Your email address will not be published.