Take a fresh look at your lifestyle.

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ! जिल्ह्यातील तब्बल 75 ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; इतर सदस्यही रडारवर..

5

2020-21 आणि 2021-22 या वर्षांत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांना वर्षभरात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु दिलेल्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने तीन तालुक्यांतील 75 सदस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. इतर सहा तालुक्यांतील शेकडो ग्रामपंचायत सदस्य रडारवर असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात 2020-21 मध्ये 617 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या काळात 217 ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पडून निकाल जाहीर करण्यात आले. या दोन्ही निवडणुकांमध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश शासनाने दिले होते.

परंतु अनेक ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांनी या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतचे अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यासमोर या सदस्यांची सुनावणी घेण्यात आली.

सुनावणीनंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तीन तालुक्यांतील 357 ग्रामपंचायत सदस्यांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 75 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली आहे. जिल्ह्यात सहा तालुक्यांतील शेकडो ग्राम पंचायत सदस्यांवर कारवाईचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीला आहेत. लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

फुलंब्री
2020-21
22 पैकी 11
2021-22
42 पैकी 4

सोयगाव
2020-21
178 पैकी 27
2021-2022
23 पैकी 7

पैठण
2020-21
18 पैकी 15
2021-22
74 पैकी 11

एकूण 357 पैकी 75

5 Comments
  1. Ellen4769 says
  2. Cale2426 says
  3. Kendall2078 says
  4. Richard3717 says
  5. Eduardo226 says
Leave A Reply

Your email address will not be published.