Surat-Chennai expressway : महामार्गाच्या कामाला अक्कलकोटमधून सुरुवात ! पहा, नगर-बीड-धाराशिव-सोलापूरातील ‘या’ गावांतून जाणार महामार्ग..
दिल्ली आणि मुंबई एक्सप्रेस – वे नंतर देशातील दुसरा सर्वात लांब एक्सप्रेसवे सुरत – चेन्नई एक्सप्रेस – वे हा देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे, ज्याची एकूण लांबी 1271 किमी आहे. दिल्ली – मुंबई एक्सप्रेसवेची एकूण लांबी सुमारे 1,350 किमी आहे. हा एक्सप्रेस-वे सुरतेहून थेट चेन्नईला जोडला जाणार आहे..
भारतमाला परियोजनेतून मंजूर असलेल्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना जोडणारा हा एक्सप्रेस – वेच्या कामाने आता गती पकडली आहे. या एक्सप्रेस – वेच्या प्रत्यक्ष कामाला सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून सुरुवात झाली आहे. तालुक्यातील जवळपास 11 गावातून हा 33 किमीचा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या जवळपास 297.25 हेक्टर जमीनीचे संपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी 241.99 हेक्टर म्हणजेच 81.41 टक्के क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
या प्रकल्पाचा शुभारंभ काही वर्षापूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला होता. त्यासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने सुरु होती. अक्कलकोट तालुक्यातील जवळपास 11 गावातील 539 गटातून हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी 297.25 हेक्टर जमीनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.
त्यासाठी 178 कोटी 37 लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार होती. आतापर्यंत त्यापैकी 169 कोटी 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे. तर 241.99 हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे.
त्यामुळे संपादित करण्यात आलेली जमीन आता रस्ता तयार करणाऱ्या कंपनीच्या ताब्यात देण्याचे काम सुरु झाले आहे. शेतकऱ्यांना वारंवार सूचना देवून तसेच काही महिन्यापूर्वी नोटीसा देवूनही काही शेतकऱ्यांनी त्या जमीनीत पिके लावली होती. त्यामुळे प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात त्या जमीनीचा ताबा घेवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. कर्नाटक राज्याच्या हद्दीपासून अलीकडे अक्कलकोट तालुक्यातील हसापूर या गावातून 33 किमीच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे..
Surat-Chennai Greenfield Highway
अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावांतून जाणार महामार्ग
शेतकऱ्यांचे नुकसान करणे हा प्रशासनाचा उद्देश नाही..
सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे टेंडर झाले असून, अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक हद्दीपासून 33 किमीच्या कामाला सुरुवात झाली आहे. संपादीत झालेल्या जमीनीचा ताबा मिळाल्यास कामाला सुरुवात करता येईल, असे कंपनीच्या वतीने वारंवार सांगण्यात येत होते. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेवून हे काम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान करणे हा प्रशासनाचा उद्देश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या बाबतीत वारंवार सुचना देण्यात आल्या होत्या. मंजूर असलेले काम सुरु होणे अपेक्षित होते. त्यामुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
दोन दिवसापासून अधिकारी फिल्डवर..
या कामाचे टेंडर जीआर इन्फ्रा कंपनीला मिळालेले आहे. गेल्या सात ते आठ महिन्यापासून हे काम रेंगाळले होते. त्यामुळे प्रत्यक्ष संपादित झालेल्या जमीनीचा ताबा घेवून कामाल सुरुवात करण्याची गरज होती. त्यासाठी गेल्या दोन दिवसापासून महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून काम करित आहेत.
या कामाला शेतकऱ्यांनी काही दिवस मुदतवाढ मागितली होती. मात्र शेतकऱ्यांना यापूर्वीच कल्पना दिली होती. तरीही शेतकरी जमिनी कसत होते. त्यामुळे नाईलाजास्तव काम सुरु करावे लागल्याची माहिती महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आमच्यावर अन्याय झाला-
शरणबसप्पा भुती अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी परिसरात 491 गट नंबरमध्ये माझी बागायत जमीन आहे. मात्र मला मोबदला जिरायत जमिनीचा मंजूर झालेला आहे. माझी जमीन बागायती आहे. हा मोबदला मान्य नाही, म्हणून आम्ही न्याय मागत असतानाच प्रशासनाने आमच्या उभ्या पिकात बुलडोजर फिरवून आमच्या शेतीचे नुकसान केले आहे. त्याची नुकसान भरपाई आम्हाला मिळावी आणि शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी शरणबसप्पा भुती यांनी केली आहे..